संतोष वानखडे/ वाशिम: शेतमालाचे उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नातून रासायनिक खतांच्या वापरावरील नियंत्रण सुटत चालले आहे. २00७-0८ या आर्थीक वर्षात प्रति हेक्टरी १0९ किलो असलेला रासायनिक खतांचा वापर २0१४-१५ या वर्षात १४७ किलोग्रॅमवर पोहचला आहे. खतांची अतिरिक्त ह्यमात्राह्ण जमिनीचा पोत बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे. कृषीक्षेत्रात क्रांतीकारक बदल घडवून आणण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान व उपक्रमांचा वापर केला जात आहे. पोषक जमिनीतून भरघोष उत्पादनाचे ह्यरिझल्टह्ण येत असल्याने शेतकरी जमिनीला पोषक बनविण्यासाठी रासायनिक खतांच्या वापराकडे वळले असल्याचे दिसून येते. एका र्मयादेपर्यंत रासायनिक खतांचा वापर जमिनीसाठी पोषक ठरू शकतो. रासायनिक खतांच्या अतिवापराचे दुष्परिणाम शेतकर्यांना माहित नसल्याने, खतांचा वापर करण्याची शेतकर्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. या स्पर्धेतून खतांचा वापर झपाट्याने वाढत असल्याची साक्ष महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयाची आकडेवारी देत आहे. खत व किटकनाशक औषधींच्या वापराविषयी काही संकेत आहेत. यानुसार खताचा सरासरी वापर दर हेक्टरी ९५ किलो ग्रॅमच्या आसपास असणे अपेक्षीत आहे. कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, राज्यात २00७-0८ मध्ये रासायनिक खतांचा दर हेक्टरी सरासरी वापर १0९ किलो ग्रॅम होता. २0१२-१३ या आर्थिक वर्षात प्रति हेक्टरी ११६ किलो, २0१३-१४ मध्ये ११९ किलो तर २0१४-१५ या वर्षात १४७ किलोग्रॅमवर खतांचा वापर पोचला आहे. २0१२-१३ मध्ये राज्यात ५४.७ लाख मेट्रीक टन खतांचा वापर झाला. २0१३-१४ मध्ये ५९.९ लाख मेट्रीक टन तर २0१४-१५ मध्ये ७६ लाख मेट्रीक टन खतांचा वापर झाल्याचे कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते. रासायनिक खते व किटकनाशक औषधांनी कृषी क्षेत्रात क्रांतीकारक बदल घडवून आणले आहेत. तर दुसरीकडे खतांचा अतिरिक्त वापर जमिनीचा पोत बिघडविणारा तर औषधींचा जादा फवारा मानवी आरोग्य धोक्यात टाकणारा ठरत आहे. संभाव्य परिणाम ओळखून शेतकर्यांनी खतांचा वापर योग्य प्रमाणात करणे गरजेचे ठरत आहे.
रासायनिक खतांचा वापर वाढला!
By admin | Published: June 06, 2015 1:06 AM