शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

क्रिकेट सट्टय़ाकरिता बनावट सिमकार्डचा वापर !

By admin | Published: June 22, 2016 1:00 AM

आकोटमधील नरेश भुतडाविरुद्ध चौथा गुन्हा दाखल

अकोला/आकोट: आकोट येथील क्रिकेट सट्टय़ाकरिता वापरण्यात आलेले सिमकार्ड बोगस दस्तावेजाद्वारे मिळविल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी आरोपी नरेश भुतडासह सहा जणांविरुद्ध २१ जून रोजी आकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. तपासाअंती अकोला येथील दहशतवाद विरोधी कक्ष (एटीसी) ने भुतडाविरुद्ध हा चौथा गुन्हा दाखल केला.नागपूर येथील फिर्यादी सुनील मूलचंद मनवानी यांची कागदपत्रे तयार करून स्वत:च्या फायद्यासाठी त्यांच्या कागदपत्रांचा नवीन सिमकार्ड घेण्यासाठी वापर करण्यात आल्याची तक्रार २१ एप्रिल रोजी आकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून आरोपी नरेश लक्ष्मीनारायण भुतडा, श्याम मधुकर कडू, चेतन महेश जोशी, वीरेंद्र दर्यावसिंह रघुवंशी (सर्व रा. आकोट), नागपूर येथील रिलायन्स कंपनीचा किरकोळ विक्रेता निलेश अ. अछपीला तसेच वितरक राजगुरू डिस्ट्रीब्युटरचा मालक अशा सहा जणांविरुद्ध भादंविच्या कलम ४२0 ( फसवणूक), ४६८, ४७१ (खोटे दस्तऐवज तयार करणे व खरे असल्याचे भासविणे), ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी केली. 

बोगस सिमकार्ड घटनेची पार्श्‍वभूमी लोहारी रोडवरील एमआयडीसीमधील योगिराज ऑइल मिलमध्ये १९ मार्च रोजी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टा घेतला जात असताना, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाने छापा घातला होता. यामध्ये कलम ४,५ मुंबई जुगार अँक्टनुसार गुन्हा दाखल करून नरेश भुतडासह चार आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून २४ मोबाइलचा सेट, लॅपटॉप, संगणक, हॉटलाइनसाठी वापरलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले होते. या साहित्याच्या आधारे तपासात माहिती संकलित करण्यात येत असून, बोगस सिमकार्ड तयार केल्याचे उघडकीस येत असल्याने गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

भुतडाचा अवैध व्यवसाय पोलिसांच्या 'रडार'वरभुतडाच्या अवैध व्यवसायाचे साम्राज्य पोलिसांच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे.गत अनेक वर्षांपासून आकोट शहरात बस्तान मांडून असलेल्या अवैध धंद्यांचा बिमोड जिल्हा पोलीस यंत्रणा करीत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले अनेक मोठे अवैध धंदे छोट्या शहरात सुरू असल्याचे उघडकीस येत असल्याची पोलिसांची माहिती आहे. क्रिकेट सट्टाप्रकरणी नरेश भुतडाविरुद्ध मंगळवारी चौथा गुन्हा दाखल करण्यात आला.