अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचार्यांनी कार्यालयात येताना, हेल्मेटचा वापर करावा, अन्यथा हेल्मेटशिवाय कार्यालयात येणार्या कर्मचार्यांवर मंगळवारपासून कारवाई करण्यात येणार आहे, असा आदेश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सोमवारी महसूल कर्मचार्यांना दिला. अपघाताच्या घटनांमध्ये डोक्याचा बचाव करण्यासाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात येणार्या सर्व महसूल अधिकारी व कर्मचार्यांनी २५ ऑगस्टपासून हेल्मेटचा वापर करावा. तसेच चारचाकी वाहनांमधून येणार्या महसूल अधिकार्यांनी ह्यसीटबेल्टह्णचा वापर करावा. हेल्मेट व सीटबेल्टशिवाय कार्यालयात येणार्या महसूल अधिकारी व कर्मचार्यांवर एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच तीन दिवस हेल्मेट व सीटबेल्टशिवाय कार्यालयात येणार्या कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी महसूल अधिकारी व कर्मचार्यांना दिला. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांच्या स्वाक्षरीचे परिपत्रकदेखील काढण्यात आले.
‘हेल्मेट’चा वापर करा; अन्यथा कारवाई!
By admin | Published: August 25, 2015 2:52 AM