सुपर स्पेशालिटीची केली पाहणी
विरोधी पक्षनेता फडणवीस यांनी सर्वप्रथम सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली. याप्रसंगी डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी इमारतीमध्ये प्रस्तावित कोविड रुग्णालयासंदर्भात माहिती दिली. विशेषत: कोविडच्या बालरुग्णांसाठी आवश्यक सुविधांसंदर्भातही त्यांनी यावेळी माहिती दिली. सोबतच कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी मनुष्यबळाची मोठी समस्या असल्याचेही त्यांनी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले.
कोविड वॉर्डाला भेट
कोविडच्या गंभीर रुग्णांसाठी असलेल्या वॉर्ड क्रमांक २९, ३० आणि ३१ ची फडणवीस यांनी पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी रुग्णांच्या उपचारासंदर्भात माहिती जाणून घेतली. तसेच ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेची देखील माहिती घेतली.
सीएसआर फंडातून जीएमसीला दिले ऑक्सिजन प्लांट
सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये या अनुषंगाने फडणवीस यांनी सीएसआर फंडातून जीएमसीला ऑक्सिजन निर्मिती प्लांट देणार असल्याचे घोषित केले. या ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून सुमारे १४० जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती करणे शक्य होणार आहे.