शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

बडतर्फ शिक्षकांचा महापालिकेवर दबावतंत्राचा वापर

By admin | Published: August 05, 2016 1:33 AM

अस्थायी नऊ कला शिक्षकांना सेवेतून बडतर्फ; लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रशासनावर दबावतंत्राचा वापर.

अकोला: तत्कालीन नगर परिषदेच्या कार्यकाळात तात्पुरत्या काळासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अस्थायी नऊ कला शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी केली. बडतर्फ झालेल्या काही शिक्षकांनी मंत्रिमहोदय व स्थानिक आमदारांच्या भेटीगाठी घेण्याचा सपाटा लावला असून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रशासनावर दबावतंत्राचा वापर सुरू केल्याची माहिती आहे.तत्कालीन नगर परिषदेच्या कालावधीत शिक्षण विभागाने तात्पुरत्या काळासाठी एकूण ३१ अस्थायी शिक्षकांची नियुक्ती केली होती. नियुक्त करण्यापूर्वी संबंधित शिक्षकांना सेवेत कायम करण्यासाठी कोणताही हक्क किंवा दावा सांगता येणार नाही, अशी अट नमूद करण्यात आली होती. सुरुवातीला दर दोन महिन्यांनी अस्थायी शिक्षकांना नियुक्तीचे आदेश दिले जात होते. अस्थायी शिक्षकांना सेवेतून कमी करण्याचा मुद्दा प्रशासनाने लावून धरला असता, यामधील नऊ कला शिक्षकांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. याप्रकरणी मनपाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर शिक्षण विभागामार्फत अहवाल मागविण्यात आला. शिक्षण विभागाच्या अहवालानुसार मनपा आयुक्त अजय लहाने यांनी सात कला शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली. हायकोर्टाच्या आदेशानुसार विभुते आणि झाडे नामक कला शिक्षकांची सेवा यापूर्वीच समाप्त करण्यात आली होती. बडतर्फ झालेल्या शिक्षकांनी मनपाच्या निर्णयाला नागपूर खंडपीठात आव्हान दिले. त्यावेळी न्यायालयाने शिक्षकांची याचिका स्वीकारली; मात्र मनपाच्या निर्णयाला स्थगिती न दिल्याने शिक्षकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. बडतर्फ झालेल्या शिक्षकांमध्ये काही जण शिक्षक संघटनांचे पदाधिकारी होते. त्यांनी प्रत्येक वेळेस संघटनेच्या माध्यमातून शिक्षण विभाग व प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. आता न्यायालयातून दिलासा मिळण्याची अपेक्षा धूसर होत असल्याचे लक्षात येताच काही मंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रशासनावर दबावतंत्राचा वापर सुरू केल्याची माहिती आहे.