चष्म्याला करा बाय बाय...
कमी वयात चष्मा नको असेल, तर कॉन्टॅक्ट लेन्स त्याला उत्तम पर्याय आहे. विशेषत: तरुणांसाठी याचा उपयोग फायदेशीर ठरतो. कॉन्टॅक्ट लेन्समुळे डोळ्यांवरील ताणदेखील कमी होत असल्याने ते फायदेशीर आहे.
ही घ्या काळजी
कॉन्टॅक्ट लेन्स ही नाजूक असते. त्यामुळे तिला हाताळताना विशेष काळजी घेण्याची गरज असते. धूळ व मातीपासून कॉन्टॅक्ट लेन्सचा बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
लेन्स लावण्यापूर्वी आणि काढल्यानंतर सोल्युशनद्वारे ते स्वच्छ करणे गरजेचे आहे. तसेच रात्री झोपण्यापूर्वी लेन्स काढणे गरजेचे आहे. लेन्सला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
नेत्रतज्ज्ञ म्हणतात
कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. ही लेन्स वापरताना योग्य काळजी न घेतल्यास डोळ्यांना इजादेखील होऊ शकते. त्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना धूळ, मातीपासून तिचा बचाव करावा, लेन्स काढताना हात स्वच्छ धुवावे.
- डॉ. जुगल चिराणिया, नेत्रतज्ज्ञ
कॉन्टॅक्ट लेन्सही नाजूक असते. त्यामुळे तिला हाताळताना विशेष काळजी घ्यावी. धूळ, मातीपासून लेन्सचा बचाव करावा. तसेच लेन्स काढताना आणि लावताना हात स्वच्छ धुवावेत. लेन्सचा वापर करताना योग्य काळजी न घेतल्यास डोळ्यांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-डॉ. भावेश गुरुदासानी, नेत्ररोग तज्ज्ञ, जीएमसी