भेंडीमहाल येथील उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या भेंडीमहाल, भेडगाव, भेडीसुत्रक, खेर्डा भागई, वडगांव, भेंडी काझी आदी गांवात शिबिराचे आयोजन केले होते. लसीकरणाच्या यशस्वितेसाठी गावात सरपंचांनी दवंडी देऊन जनजागृती केली. त्यामुळे या शिबिरांना प्रतिसाद मिळाला असून, एकाच दिवसात १५४ जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत डॉ. आगलावे यांच्या मार्गदर्शनात लसीकरण शिबिर यशस्वी झाले. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी पल्लवी नंदापुरे, सोळंके आरोग्य सेविका, करूणा राठोड भेंडीमहाल, आशा वर्कर मिनल महल्ले, भेंडीसुत्रक आशावर्कर यमुना पिंजरकर उपस्थित होते. तसेच सरपंच उमिता संदीप राठोड, उपसरपंच दिनेश विजय राठोड, पोलीस पाटील रामकुमार महल्ले, ग्रामपंचायत शिपाई प्रवीण पवार आदींनी परिश्रम घेतले.
---------------
शिबिरापूर्वी गावांमध्ये दिली दवंडी
भेंडीमहाल उपकेंद्राअंतर्गत येत असलेली ६ गावे भेंडीमहल भेंडीसूत्र, भेडगाव खेर्डा भागई, वडगांव, भेंडी काझी येथील सरपंचांनी सहकार्य केले आहे. सरपंचांनी शिबिराच्या पूर्वी गावात दवंडी देऊन जनजागृती केली परिणामी नागरिकांच्या प्रतिसाद मिळाला.
------------------
आकोलखेड ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू
आंबोडा : येथून जवळच असलेल्या आकोलखेड येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. या ठिकाणी नागरिक, महिलांची गर्दी होत आहे. रुग्णालय परिसरात योग्य ती पिण्याच्या पाण्याची व सावलीची व्यवस्था नसल्याने रखरखत्या उन्हात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. मंडप टाकून सावली उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.