कोरोना लसीकरणाबद्दल सविस्तर माहिती देत लसीकरण का करणे आवश्यक आहे, त्यापासून दुष्परिणाम आहेत किंवा नाही याबद्दल सविस्तर चर्चा करीत खासगी डॉक्टरांच्या अडीअडचणीसुद्धा जाणून घेतल्या. शहरातील सर्व डॉक्टर, खासगी मेडिकल प्रॅक्टिस करणाऱ्यांसोबत, कोविड नोडल अधिकारी मीना शिवाल यांनी संवाद साधत कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याला लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करा, आजारी रुग्ण असलेल्यांना योग्य असा सल्ला देऊन लसीकरण करण्यास बाध्य करावे तसेच लसीबदल काही शंका असल्यास निराकरण करणे व जास्तीत जास्त जनतेस लसीकरण करून घेण्याकरिता प्रोत्साहित करावे, जेणेकरून देशावर आलेल्या कोरोनारूपी संकटातून देशवासी लवकर मुक्त होऊन कोरोनाला पिटाळून लावतील. याप्रसंगी खासगी डॉक्टरांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळेस स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नेमाडे, डॉ. वाडेकर, डॉ. बुब, डॉ. अवघाते, डॉ. जेठवाणी उपस्थित होते.
लसीकरणाची जागृती; खासगी डॉक्टरांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:19 AM