चतारी ग्रामीण रुग्णालयातील ७ व्हॅक्सिन लस लंपास झाल्याची धक्कादायक घटना १२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी १६ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा व्हॅक्सिन गहाळ झाल्याची तक्रार चान्नी पोलिसात दिली होती. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक स्वप्निल माहोरे यांच्या फिर्यादीवरून डाटा एंट्री ऑपरेटर दीपक ज्ञानदेव सोनटक्के रा. वाडेगाव याच्याविरुद्ध चान्नी पोलिसांनी भादंविच्या ३८० कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करून २० फेब्रुवारी रोजी पातुर न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात आरोपी वाढण्याची शक्यता आहे. आरोपीने व्हॅक्सिन चोरून कोणाला विकली किंवा दिली याबाबत चौकशी करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
व्हॅक्सिन चोरणाऱ्या आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:35 AM