शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

वंचित बहुजन आघाडी : नव्या सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 1:28 PM

आंबेडकरांनी स्वत:च्या दलित समाजासोबत अठरापगड जातींची मोट बांधून नवा पर्याय उभा केला; मात्र आता या नंतरच्या कोणत्याही निवडणुकीत ‘भारिप-बमसं’ या नावाचा पक्ष दिसणार नाही.

- राजेश शेगोकार

अकोला : अलीकडच्या राजकारणात 'सोशल इंजिनिअरिंग' हा परवलीचा शब्द झाला आहे; मात्र महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात याच 'सोशल इंजिनिअरिंग'च्या माध्यमातून सत्ता मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला तो अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी. याच प्रयोगाची चर्चा पुढे महाराष्ट्रात 'अकोला पॅटर्न' या नावाने झाली. १९९० ते २००४ पर्यंत याच अकोला 'पॅटर्न'ने आपला सुवर्णकाळ अनुभवला, असे म्हणता येईल. या अकोला पॅटर्नचे राजकीय नाव होते 'भारिप-बहुजन महासंघ' आंबेडकरांनी स्वत:च्या दलित समाजासोबत अठरापगड जातींची मोट बांधून नवा पर्याय उभा केला; मात्र आता या नंतरच्या कोणत्याही निवडणुकीत ‘भारिप-बमसं’ या नावाचा पक्ष दिसणार नाही. वंचित बहुजन आघाडी या नावाने भारिप-बमसंचा पुढचा राजकीय प्रवास असेल, अशी घोषणाच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी केल्यामुळे राजकीय पटलावरून भारिप-बमसंची ओळख मिटली जाणार आहे.१८८४ ला भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून अ‍ॅड. आंबेडकरांनी अकोल्यात राजकीय कारकीर्द सुरू केली. अकोल्यात मराठा समाजाचे असलेले प्राबल्य, शिवसेनेचा अकोल्यात सुरू झालेला झंझावात, या पृष्ठभूमीवर मखराम पवार यांना सोबत घेऊन त्यांनी बहुजन महासंघ स्थापन केला. १९९३ च्या नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत भीमराव केराम हे आमदार झाले व पुढे भारिप-बमसं हे समीकरणच झाले. सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांना लंकेश्वर गुरुजी, बी.आर. शिरसाट, दिलीप तायडे, प्राचार्य सुभाष पटनायक असे कार्यकर्ते मिळालेत. या कार्यकर्त्यांनी ही चळवळ आणि पक्ष तळागाळात रुजवला अन् मोठाही केला. १९८९ ते १९९६ या तीन लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. आंबेडकरांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांच्या पक्षाला मात्र अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश अनुभवता आले. स्वत: बाळासाहेब १९९७ आणि ९८ असे दोन वेळा खासदार म्हणून विजयी झालेत. तर डी. एम. भांडे, मखराम पवार, रामदास बोडखे अशांना मंत्रिपदाची ऊबही मिळाली. हरिदास भदे, बळीराम सिरस्कारांना आमदार म्हणून मिरवता आले. श्रावण इंगळे, बालमुकुंद, भिरड, साबिया अंजूम सौदागर, पुष्पा इंगळे, शरद गवई, संध्या वाघोडे यांच्यासारख्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद उपभोगता आले. तर अकोल्याबाहेर भीमराव केराम यांच्यासह, धुळे जिल्ह्यातील साक्री मतदारसंघातून वसंतराव सूर्यवंशी असे आमदारही त्यांनी निवडून आणले. या पृष्ठभूमीवर जून २०१८ मध्ये त्यांनी पंढरपुरात वंचित बहुजन आघाडीची घोषणा करून नव्या राजकीय डावाला सुरुवात केली आहे. बाळासाहेबांच्या पराभवात निर्णायक ठरणारी मुस्लीम मते वंचित बहुजन आघाडीकडे वळविण्यासाठी आता त्यांनी एमआयएमचीही साथ घेतली असून, भविष्यातील राजकारण हे याच आघाडीच्या माध्यमातून होणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे भारिप-बमसं हा परवलीचा शब्द आता राजकीय पटलावरून पुसल्या जाणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा राजकीय डाव फसला तर बाळासाहेबांचा आणखी एक प्रयोग, अशी राजकारणात नोंद होईल; मात्र तो यशस्वी झाला तर नव्या पर्वाची सुरुवात होईल. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हे वंचित बहुजन आघाडीच्या भविष्याचा निर्णय करणारे असतील एवढे निश्चित.

 

टॅग्स :AkolaअकोलाBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर