शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

‘लॉकडाऊन’च्या यात्रेत राजकारणाची ‘कावड’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:08 AM

वंचित बहुजन आघाडीने या मुद्यावर राजकीय उडी घेऊन नव्या राजकारणाचे रणशिंग फुंकले आहे.

- राजेश शेगोकार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवघ्या आठ दिवसांपूर्वी अयोध्येत राममंदिराचे भूमिजूजन झाले अन् गेल्या तीन दशकांपासून देशाच्या राजकारणात केंद्रबिंदू झालेला मंदिर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. आता अकोल्यातही मंदिर हाच मुद्दा राजकीय सारीपाटावर येऊ घातला आहे. निमित्त झाले ते अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वराच्या कावड यात्रेचे. कोरोनाच्या संकटामुळे मंदिर बंद आहे व कावड यात्राही मर्यादित करण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर झाला असताना वंचित बहुजन आघाडीने या मुद्यावर राजकीय उडी घेऊन नव्या राजकारणाचे रणशिंग फुंकले आहे.अकोल्यातील कावड यात्रा महोत्सव पंचक्रोशीचा लोकोत्सव झाला आहे. संपूर्ण देशात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी होणारी एकमेव यात्रा आहे. पूर्णामायच्या जलाने राजराजेश्वरला अभिषेक घालण्याची ही परंपरा या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे धोक्यात आली. गेल्या २४ मार्चपासून देशभरातील मंदिरे व धार्मिक स्थळे बंद आहेत. त्याला राजराजेश्वराचे मंदिरही अपवाद नाही. यावर्षी होणारी कावड यात्रा ही प्रातिनिधिक स्वरूपाची राहील, असा निर्णय घेण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरे उघडा हा मुद्दा हाती घेऊन थेट राजराजेश्वराचे मंदिरच गाठले. गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडून त्यांनी हात जोडून दर्शनही घेतले अन् कावड यात्रेबाबत शासन व प्रशासनाशी बोलून निर्णय घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. खरे तर असे आश्वासन देणे हे राजकारणात नवीन नाही; मात्र अ‍ॅड. आंबेडकरांनी थेट राजराजेश्वराचे मंदिर गाठण्यामुळे या घटनेला राजकीय क्षेत्रात गांभीर्याने घेतले जात आहे.मुळातच अकोल्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष हा एकहाती वर्चस्व मिळविणारा पक्ष आहे. त्यातही अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्लाच. या मतदारसंघातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रम हा भाजपाच्या प्रभावाखालीच होत आला आहे. कावड यात्रा महोत्सव या कार्यक्रमांमधील सर्वात मोठा कार्यक्रम. अशा स्थितीत हा मुद्दा भाजपाने आक्रमक पद्धतीने हाताळण्याची अपेक्षा असताना अ‍ॅड. आंबेडकर यांनी यामध्ये थेट मंदिर गाठल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे पहिल्या श्रावण सोमवारीच बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडून प्रातिनिधिक स्वरूपात लोकभावनेला हात घालण्याची संधी असतानाही भाजपाने व शिवसेनेने ही संधी सोडली; मात्र या निमित्ताने अ‍ॅड. आंबेडकर यांनी आपण हिंदूविरोधी नसल्याचेही संकेत देण्याची संधी घेतली. खरे तर अ‍ॅड. आंबेडकरांनी लॉकडाऊनमध्ये इतर पक्षांनी दुर्लक्षित केलेल्या सर्वच प्रश्नांवर आवाज उठवला, नाभिक समाज, फेरीवाले, आदिवासी, मजूर, लहान-मोठे व्यावसायिक यांच्या उदरनिर्वाहाची सोय झाली पाहिजे म्हणून लॉकडाऊन विरोधात भूमिका घेतली व आता राज्यभरातील मंदिरांबाबत ते पुढे आले आहेत. केवळ कोरोनाच्या नावाखाली धार्मिक सण, उत्सव व परंपरा खंडित होऊ नये ही त्यांनी घेतलेली भूमिका वंचितच्या सामाजिक अभियांत्रिकीचे नवे पाऊल आहे. त्याचा राजकीय लाभ वंचितला किती मिळेल, हे काळच ठरवेल; मात्र वंचितसाठी लोकभावनेचा कोणताच मुद्दा अस्पृश्य नाही, हे या निमित्ताने त्यांनी अधोरेखित केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारण