लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भाजीपाल्याच्या घाऊक व किरकोळ बाजारपेठेतील दरात प्रचंड तफावत असून शेतकरी, नागरिकांची यामध्ये प्रंचड लूट होत आहे. घाऊक बाजार आणि शहरातील ईतर बाजारपेठ आणि किरकोळ भाजी विक्रेत्यांच्या दरात चार पट वाढ आढळून येत आहे. भाजीपाला उत्पादक शेतकर्याच्या घामाचा माल स्वस्त दरात विकत घेऊन अडते व्यापारी आणि भाजीपाला विक्रेता ग्राहकांची लूट करीत असल्याचे चित्र आहे. जनता भाजी बाजारातील घाऊक बाजारात ३ रूपये किलोने विकल्या गेलेले टमाटे याचं किरकोळ बाजारात ५ ते १० रूपये किलोने विकले जात आहे. हेच टमाटे जठारपेठच्या बाजारपेठेत ४० रूपये किलो दराने चार पटीने विकल्या जात असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.४ शहरातील विविध बाजारपेठेच्या शाखेतील ठोक आणि चिल्लर दुकानदार या व्यतिरिक्त चारचाकी गाडीवर विक्री करणारे भाजी विक्रेते मोजले तर एकूण सात हजारांच्या घरात यांची संख्या जाते. दररोज कोट्यवधींची उलाढाल भाजीबाजारातून होते.
दरात चार पटीची तफावतजनता घाऊक बाजारात शेतकर्याच्या भाजी मालाची पहाटे ठोक दरात खरेदी होते.त्यानंतर याच जनता बाजारा दिवसभर किरकोळ विक्री होते. जनता बाजारापासून काही अंतरावर असलेल्या जैन मंदिर बाजारपेठ, जुने शहरातील जयहिंद चौक, शिवाजी नगर, डाबकी रोड, अकोट फैलच्या मस्तान चौक, जठारपेठ, सिंधी कॅम्प, तुकाराम चौक, कौलखेड, तुकाराम चौक येथील बाजारपेठमध्ये वेगवेगळ््या दराने भाजीपाल्यांची विक्री होते. घाऊक बाजारात सकाळी २० रूपये किलोची पालक अकोल्यातीलच ईतर बाजारपेठेत ८० रूपये किलोने विकल्या जाते. या किरकोळ बाजारपेठेशिवाय गल्लीबोळात जाऊन चारचाकी गाडीतून भाजीपाला विकणारे फेरीवाले त्याहून जास्त दराने भाजीपाल्याची विक्री करतात. एकीकडे मूळ उत्पादकाचा माल कवडीमोल भावाने विकत घेतला जातो आणि दुसरीकडे त्याच मालावर मध्यस्थी व्यापारी मूळ उत्पादकापेक्षा जास्त चार पटीने कमाई करीत आहे.