अकोला : वऱ्हाडात बार्शीटाकळी व तेल्हारा येथे सर्वाधिक ४० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, अकोला जिल्ह्यात २२.८ तर बुलडाणा जिल्ह्यात ३० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.मागील २४ तासांत रविवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद नारखेडा येथे १०० तर शिंदेवाही येथे ९० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भात मात्र कमी पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी, तेल्हारानंतर बाळापूर, मूर्तिजापूर येथे ३० मि.मी., अकोला व पातूर तालुक्यात २० मि.मी. तर अकोट तालुक्यात १० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा येथे ३० मि.मी., लोणार २०.० मि.मी. तर देऊळगाव राजा, खामगाव, मोताळा, नांदुरा, संग्रामपूर व शेगाव येथे प्रत्येकी १० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात कारंजा लाड, मंगरू ळपीर येथे २० मि.मी. तसेच मानोरा, रिसोड व वाशिम येथे १० मि.मी. पाऊस पडला.- विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यतायेत्या सोमवार २ ते ५ सप्टेंबरपर्यंत विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.