बदलत्या काळात भारतीय संस्कृती आणि पर्यावरण यांचे समतोल संरक्षण करण्यासाठी वटपौर्णिमा उत्सवाच्या अनुषंगाने वृक्षारोपण केल्यास मानवाला उपयुक्तच ठरेल असे मत सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने, मा. यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी प्रा. डॉ. चैतन्य पावशे, प्रा. डॉ. मिलिंद थोरात, प्रा. डॉ. सुनील वाघमारे, प्रा. डॉ सतीश मनवर यांच्यासह डॉ. प्रवीण बनकर, डॉ. महेश इंगवले, डॉ. कुलदीप देशपांडे, डॉ. रणजित इंगोले यांनी सहभाग नोंदविला.
सदर कृती कार्यक्रमप्रसंगी उपस्थित अरुणा भिकाने, डॉ. नम्रता बाभुळकर (सहायक आयुक्त पशुसंवर्धन) , भारती पावशे, प्रज्ञा थोरात, प्रीती मनवर आणि डॉ. स्नेहल पाटील (पशुधन विकास अधिकारी) आदींनी वृक्षारोपण करीत अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. श्याम देशमुख, वृक्ष लागवड अधिकारी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. वैजनाथ काळे, डॉ आनंद रत्नपारखी, डॉ. सतीश मुंडे तसेच पी. एल. ठाकूर, रामेश्वर लोथे, श्री. प्रमोद पाटील, सूर्यकांत राखुंडे, बी. जी. पाटील, सुभाष थातूरकर, आकाश गवई, अशोक तायडे इत्यादींनी परिश्रम घेतले.