अकोला - जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशपदी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांना पदोन्नती देण्यात आली. व्ही. एन. तांबी यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पदाचे कामकाज मंगळवारपासूनच सुरू केले. अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. देशपांडे हे सोमवारी सेवानवृत्त झाले. त्यामुळे न्या. व्ही. एन. तांबी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्या ३0 एप्रिल रोजी सेवानवृत्त होणार असल्याची माहिती आहे.
प्रमुख अकोला जिल्हा न्यायाधीशपदी वीणा तांबी
By admin | Published: March 02, 2016 2:48 AM