हातरुण - मोर्णा नदीच्या काठावरून जनावरांचा चारा भरून येत असलेला पिकअप ४०७ वाहन नदीपात्रात पलटी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी हातरुण येथे घडली. या अपघातात चार जण सुदैवाने बचावले. हातरुण येथील नदीकाठावर असलेल्या शेतकऱ्याच्या शेतातून कडब्याची कुट्टी पोत्यात भरून निघालेल्या ४०७ पिकअप वाहन नदीच्या काठावरून थेट नदी पत्रात कोसळले. एम. एच. २८ एच. ९०३० या वाहनाने दोन पलटया घेतल्या. वाहनाचे ड्रायव्हर मोहमद फारुख शे. बरामत, शे. हसन शे. मनवर, इकराम अली, शे अशपाक शे. मनवर यांना सुदैवाने कोणतीहि दुखापत झाली नाही. या वाहनात १३ ते १४ कि्वंटल कडब्याची कुट्टी भरलेले पोते होते. यामुळे वाहन व जनावरांचा चारा असे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नदीकाठावरून येत असतांना वाहन नदीपात्रात पलटी झाल्याने सकाळच्या वेळेस शेतात जात असलेल्या शेतकऱ्यांनी यावेळी मदत करून वाहनात अडकलेल्यांना बाहेर काढले. सकाळच्या वेळेस ही घटना घडल्याने ही घटना पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. नदीकाठावरून शेतात जाण्यासाठी असलेले रस्त्यांची रेतीची व मातीची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांनी दुर्दशा केल्याने अपघाताची घटना घडली आहे. अवजड वाहनांनी शेतरस्त्यांची दुरवस्था केल्याने शेतकऱ्यांना शेतातून माल घरी आणताना कसरत करावी लागत आहे.
हातरुण येथील मोर्णा नदीपात्रात कडबा कुट्टीचे वाहन कोसळले; चार जण बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 1:09 PM
हातरुण - मोर्णा नदीच्या काठावरून जनावरांचा चारा भरून येत असलेला पिकअप ४०७ वाहन नदीपात्रात पलटी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी हातरुण येथे घडली. या अपघातात चार जण सुदैवाने बचावले.
ठळक मुद्दे शेतकऱ्याच्या शेतातून कडब्याची कुट्टी पोत्यात भरून निघालेल्या ४०७ पिकअप वाहन नदीच्या काठावरून थेट नदी पत्रात कोसळले. या वाहनात १३ ते १४ कि्वंटल कडब्याची कुट्टी भरलेले पोते होते. यामुळे वाहन व जनावरांचा चारा असे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.