शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

नगरसेवकांच्या आक्षेपामुळे वाहनांच्या ठरावाला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:20 AM

महापालिकेत आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त यासह शासनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच मनपा पदाधिकाऱ्यांसाठी भाडेतत्वावरील वाहनांचा वापर केला जाताे़ इंधनाच्या ...

महापालिकेत आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त यासह शासनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच मनपा पदाधिकाऱ्यांसाठी भाडेतत्वावरील वाहनांचा वापर केला जाताे़ इंधनाच्या दरात चढउतार हाेत असल्याने याकरिता मनपाच्या माेटार वाहन विभागाकडून दरवर्षी निविदा प्रसिध्द केली जाते़ यंदाही या विभागाने निविदा प्रसिध्द केली असता तीन एजन्सीने अर्ज सादर केले हाेते़ यापैकी श्रीकृपा ट्रॅव्हल्सचे दर कमी असल्यामुळे माेटार वाहन विभागाने ही निविदा मंजुरीसाठी २९ एप्रिल राेजी पार पडलेल्या स्थायी समितीसमाेर सादर केली़ अर्थात, प्रशासनाने टिप्पणी सादर केल्यामुळे स्थायी समितीने प्राप्त निविदेवर चर्चा करीत मंजुरी दिली़ त्यावेळी सभेत सत्ताधारी भाजपचे सदस्य विजय इंगळे, काॅंग्रेसचे सदस्य पराग कांबळे, माेहम्मद इरफान आदींनी निविदा प्रक्रियेत समाविष्ट शर्ती व अटींवर आक्षेप नाेंदवला हाेता़ यादरम्यान, स्थायी समितीने तयार केलेला ठराव महापालिका आयुक्त निमा अराेरा यांच्याकडे सादर करण्यात आला असता नगरसेवकांच्या आक्षेपामुळे या संपूर्ण प्रक्रियेला ‘ब्रेक’ लावून निविदेतील अटी व शर्तींचा पुनर्विचार केला जाणार असल्याची माहिती आहे़

तीन वर्षातील कराराची हाेणार तपासणी

मनपा प्रशासनाच्या स्तरावर वाहने भाडेतत्वावर घेण्याच्या प्रक्रियेत मागील तीन वर्षांच्या कराराची तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे़ साहजिकच त्यावेळी व आज राेजी इंधनाचे दर नेमके काय हाेते, हे विचारात घेतल्या जाणार आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यंदाची निविदा कमी दराची आढळून आल्यास स्थायी समितीच्या ठरावावर शिक्कामाेर्तब हाेण्याची शक्यता आहे़

नगरसेवकांच्या आक्षेपाची हाेणार पडताळणी

स्थायी समितीमध्ये भाजप व काँग्रेसच्या नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची पडताळणी केली जाणार आहे़ पडताळणीअंती प्रशासनाच्या स्तरावर याेग्य ताे निर्णय घेतला जाणार आहे़

भाजप पदाधिकाऱ्यांचा जीव टांगणीला

प्रशासनाने मंजूर केलेल्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली़ आता ऐन वेळेवर प्रशासनाने हा ठराव बाजूला सारल्यामुळे सत्तापक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे़