...........
अकाेल्यातील वादळग्रस्तांना मदत
अकोला : जैन चौकातील शारदा तुकाराम जाधव, सुभद्रा सुरेश जाधव, नितीन नारायण खेडकर, प्रमोद नारायण खेडकर, मंगला श्यामसुंदर जाधव, पोळा चौक येथील दशरथ बावणे, रेखा मेहत्रे, शेख अहमद, शेख हुसेन, संतोष गडेकर, देशमुख बाई माळीपुरामधील किरण राकेश, माणिक बोरकर, माळीपुरा लातूर बाबुराव कोल्हटकर, तर फाइल दुर्गा घुसळे, आंबेडकरनगर तर जुना आळशी प्लॉट येथील हरीश मुकुंद पवार यांच्या घरांना वादळाचा फटका बसला. त्यांना आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश शासनाच्या वतीने देण्यात आल. यावेळी अनिल गरड, अजय शर्मा, कैलास रणपिसे, वसंत संदलकर, राजेश रेड्डी, सतीश ढगे, वैशाली शेळके, गोकुळ पोटले, नवीन जाधव, हरिभाऊ काळे, मनीष मुरारका, रमेश अलकरी गायकवाड, टोनी जयराज, नितीन राऊत, पप्पू वानखडे, तहसीलदार कराव, मंडळ अधिकारी, तलाठी राठोड व दामोदर यांची उपस्थिती हाेती.
फाेटाे
.......................
राजीव गांधी यांना अभिवादन
बाळापूर : बाळापूर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय राजीव गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी विधानसभा महासचिव शुभम तिडके यांच्या नेतृत्वाखाली बाळापूर शहरातील गरजूंना व कामगारांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमोद डंबेलकर, जयराम सोनवणे, मनीष तायडे, गिरीश सतीवले, रत्नदीप तिडके, भीमा वानखडे उपस्थित होते.
.......................
बॅंक कर्मचाऱ्यांचे लसीकरण करा
अकोला : बँक कर्मचारी अधिकारी, पतसंस्था, तसेच बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना व वीज वितरण कंपनी, तसेच पत्रकारांना त्वरित लसीकरण देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला द्यावे, अशी मागणी आमदार जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली. काेराेना संकटाच्या काळामध्ये बँक कर्मचारी कर्तव्यावर असल्याची जाणीव सावरकर यांनी सरकारला करून दिली आहे.
...............................
लायन झोन चेअरमनपदी उपाध्याय
अकोला : लायन्स क्लब अकोला मिडटाउनचे अध्यक्ष मुरलीधर उपाध्याय यांची लायन झोन चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली. प्रांतपाल दिलीप मोदी यांनी मुरलीधर उपाध्याय यांच्याकडे या माध्यमातून लायन्स क्लब अकोला मिडटाउन, लायन्स क्लब अकोला इलाईट, लायन्स क्लब वाशिम, लायन क्लब वाशिम मिडटाउन या क्लबची जबाबदारी देऊन त्यांचा गौरव केला.
..........................