लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी ‘ऑनलाइन’ अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर, गत ५ ऑगस्ट रोजी जिल्हय़ात ‘ऑफलाइन’ अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामध्ये जिल्हय़ातील ६ हजार ७00 शेतकर्यांकडून प्राप्त झालेल्या ‘ऑफलाइन’ अर्जांची पडताळणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येत आहे.पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी ‘ऑनलाइन’ अर्ज सादर करण्याची मुदत गत ४ ऑगस्टपर्यंत होती. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर शासन निर्णयानुसार गत ५ ऑगस्ट रोजी एक दिवस पीक विमा काढणार्या शेतकर्यांचे ‘ऑफलाइन’ अर्ज जिल्हय़ातील सेतू केंद्र आणि कॉमन सर्व्हिस सेंटरवर (सीएससी) स्वीकारण्यात आले. त्यामध्ये जिल्हय़ातील ६ हजार ७00 शेतकर्यांचे ऑफलाइन अर्ज प्राप्त झाले. प्राप्त झालेले पीक विम्याचे ऑफलाइन अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात संकलित करण्यात आले. पीक विम्यासाठी शेतकर्यांकडून प्राप्त झालेल्या ऑफलाइन अर्जांच्या पडताळणीचे काम जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, नॅशनल इश्युरन्स कंपनी, कृषी विभाग अधिकार्यांच्या समितीमार्फत सुरू करण्यात आले आहे.
‘या’ कागदपत्रांची केली जात आहे पडताळणी!पीक विमा काढण्यासाठी ऑफलाइन अर्ज सादर केलेल्या शेतकर्यांनी अर्जासोबत जोडलेल्या सात-बारा, शेतीचे क्षेत्र, ३१ जुलैपूर्वीचा पीक पेरा, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक इत्यादी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे.