तालुक्यातील पुरातन असलेल्या शेलू वेताळ या ठिकाणी असलेले वेताळ बाबा मंदिरच्या दर्शनासाठी विदर्भातून अनेक भाविक पौष महिन्याच्या दर रविवारी असलेले यात्रा सहभागी होतात. महाप्रसादाचे आयोजन होत असल्याने या ठिकाणी आठ ते दहा हजार भाविक जमतात. त्यामुळे येथे अनेक व्यावसायिक विविध प्रकारचे साहित्य घेऊन दुकाने थाटतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनेसाठी उपविभागीय अधिकारी अभसिंह मोहिते यांनी वेताळ बाबा यात्रा महोत्सव रद्द करण्याचा आदेश पत्राद्वारे दिला आहे. त्यामुळे १७ जानेवारी ते ७ फेब्रुवारीपर्यंत होणारा वेताळ बाबा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनी घरूनच वेताळ बाबांची पूजा करण्याचे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून परपंरा अखंडितपणे सुरू राहणार, असे वेताळ बाबा संस्थानचे अध्यक्ष राजू वासुदेवराव सदार यांनी सांगितले. (फोटो)
वेताळ बाबा यात्रा महोत्सव रद्द !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:16 AM