अकोला पोलीस दलाच्या या खेळाडूने महाराष्ट्र पोलीस फुटबॉल टीमचा पाया मजबूत केला होता. सन १९५८ ते १९८० पर्यंत ते महाराष्ट्र पोलीस दलासाठी खेळत राहिले. तसेच त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या संघाचे कर्णधारपददेखील सांभाळले आहे. सन १९६२ मध्ये भारताचा रग्बी फुटबॉल संघ श्रीलंका येथे गेला होता. पंढरीनाथ दादा यांनी या संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
पंढरीनाथ गोपनारायण हे महाराष्ट्र व अकोला फुटबॉल संघासाठी अभेद्य भिंत होते. अकोला फुटबॉलला यशोशिखरावर पोहोचविण्यात पंढरीनाथ गोपनारायण यांचे मोठे योगदान राहिले आहे. पंढरीनाथ गोपनारायण यांच्या जाण्याने जिल्हा क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. पंढरीनाथ गोपनारायण यांच्यावर गुलजारपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.