लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार्या पद्मावती चित्र पटामध्ये इतिहासाचे विकृतीकरण करून चुकीचा इतिहास मांडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद व श्रीराम सेनेच्या वतीने विद्या नगरातील बिग सिनेमासमोर रविवारी दुपारी निदर्शने करण्यात आली आणि चित्रपटात मांडण्यात आलेल्या राणी पद्मावती यांच्या चुकीच्या आणि अपमानकारक कथेबद्दल चित्रपट निर्माता, निर्देशकाचा निषेध करण्यात आला. विहिंप व श्रीराम सेनेने दिलेल्या निवेदनात हिंदू समाजामध्ये आदराचे स्थान असलेल्या राणी पद्मावती यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि चुकीची माहिती चित्रपटात देण्यात आली. हा राणी पद्मावती यांच्या कार्याचा अपमान आहे.भावना दुखावणार्या हा चित्रपटाचा प्रेक्षकांनीसुद्धा निषेध करावा. यावेळी विहिंप व श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी बिग सिनेमासमोर निदर्शने करीत, चित्रपटाच्या विरोधात घोषणा दिल्या आणि चित्र पटाचे फलक काढून टाकण्यात आले.१ नोव्हेंबर रोजी ‘राणी पद्मावती’ हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, असा इशाराही विश्व हिंदू परिषद व श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला. निदर्शनामध्ये श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष अँड. पप्पू मोरवाल, शहराध्यक्ष रोहित तिवारी, विश्व हिंदू परिषदेचे धर्म प्रसार प्रमुख मयूर मिश्रा, विभाग प्रमुख संजय दुबे, यश दुबे, हार्दिक बóो, लोकेश वाडे, प्रतीक कामळे, शुभम ितवारी, गोविंदा पांडे, रितेश गावंडे, श्रीकांत ढगेकर, राजेश मिश्रा, अंशुमन राऊत, रवी दुबे, कार्तिक शर्मा, प्रसाद गोतमारे, मनोज मानकर, योगेश पाल, अक्षय पाल, मोहित बóो, शिवम पाठक, करण रणपिसे आदी सहभागी झाले होते.
विहिंप, श्रीराम सेनेतर्फेनिदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:12 AM
चुकीचा इतिहास मांडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद व श्रीराम सेनेच्या वतीने विद्या नगरातील बिग सिनेमासमोर रविवारी दुपारी निदर्शने करण्यात आली आणि चित्रपटात मांडण्यात आलेल्या राणी पद्मावती यांच्या चुकीच्या आणि अपमानकारक कथेबद्दल चित्रपट निर्माता, निर्देशकाचा निषेध करण्यात आला.
ठळक मुद्देराणी पद्मावतीचा खोटा इतिहास चित्रपटात मांडल्याचा निषेध