शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणुकीने वेधले लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 3:42 PM

अकोला: अश्वांवर स्वार झालेले भीमसैनिक, नीळ्या रंगाचे फेटे परिधान केलेले युवक, हातामध्ये पंचशील ध्वज आणि ढोलताशांचा निनाद, जय भीमचा जयघोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवारी दुपारी शहरातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.रेल्वे स्टेशन चौक परिसरातून रविवारी दुपारी धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या प्रारंभी अश्वांवर ...

ठळक मुद्देभारतीय बौद्ध महासभेची मिरवणुक ‘जय भीम’च्या गजराने शहर दुमदुमले

अकोला: अश्वांवर स्वार झालेले भीमसैनिक, नीळ्या रंगाचे फेटे परिधान केलेले युवक, हातामध्ये पंचशील ध्वज आणि ढोलताशांचा निनाद, जय भीमचा जयघोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवारी दुपारी शहरातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.रेल्वे स्टेशन चौक परिसरातून रविवारी दुपारी धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या प्रारंभी अश्वांवर स्वार झालेले समता सैनिक दलाचे सदस्य होते. पंचशील ध्वज हातात घेऊन जय भीमच्या घोषासह मिरवणूक पुढे निघाली.जिल्हाभरातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असलेले युवक, युवती, महिला पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून बहुसंख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आखाडा व व्यायाम शाळेचे सदस्य लाठीकाठी, चक्र, तलवारबाजी, मल्लखांबसारखे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करीत होते. प्रात्यक्षिक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. युवक, युवती हातात लेझिम घेऊन मिरवणुकीसमोर नृत्याचा फेर धरीत होत्या. हातात निळे ध्वज हातात घेऊन भीमसैनिक पुढे सरकत होते. रेल्वे स्थानक, शिवाजी पार्क, होमिओपॅथी महाविद्यालय चौक, मनकर्णा प्लॉट चौक, शहीद अब्दुल हमीद चौक, रिगल टॉकिज मार्गावर ठिकठिकाणी भीमसैनिकांच्या स्वागतासाठी स्टॉल उभारण्यात आले होते.

मिरवणुकीत सहभागी झालेल्या भीमसैनिकांना सामाजिक व राजकीय संघटनांच्यावतीने मसालाभात, पोहे, पुरीभाजीचे वितरण करण्यात आले. मिरवणूक मार्गावरील चौका-चौकांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा आणि पुतळे उभारण्यात आले होते. या दोन्ही महामानवांच्या प्रतिमा, पुतळ्यांसमोर आकर्षक सजावट करण्यात आली होती.