- राजरत्न सिरसाट
अकोला : शेतकºयांना आर्थिक स्वयंपूर्ण करायचे असेल तर गावातील शेतमालावर गावातच प्रक्रिया करणे क्रमप्राप्त आहे. म्हणूनच विविध माहितीसह शेतकºयांनी प्रक्रिया उद्योग उभारावेत, ही माहिती कृषी प्रदर्शनातून देण्यात येत असून, कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळविता येईल, यासाठीचे संशोधन, तंत्रज्ञान वापरू न शेतकºयांनी शेती करावी, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आली असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी दिली. कृषी क्रांतीचे प्रणेते भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, शेतकºयांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रश्न-आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी काय करणार?
- प्रक्रिया उद्योगावर उभे करण्यावर आमचा भर आहे. त्यासाठी शेतकºयांना तंत्रज्ञान उपलब्ध करू न दिले जाणार आहे. रेशीम शेती, मत्स्य पालन, लाख कल्टीवेशन, पशुसंवर्धन, देशी जातीवंत गायी, म्हशी संवर्धन व दुग्धव्यवसाय आदीच्या माध्यमातून शेतकºयांना जोडधंदा कसा उभारता येईल, बॉयो कंट्रोल वरही लक्ष केंद्रित केले आहे. कौशल्य विकास, पूरक व्यवसाय, गटशेती, प्रक्रिया उद्योगातील संधी, बदलत्या जागतिक परिस्थितीत फायदेशीर शेतीचे तंत्र, शेतकºयांच्या उत्पन्न वाढीसाठी व्यवसायाभिमुख माहिती येथे शेतकºयांसाठी उपलब्ध आहे.
प्रश्न- यांत्रिकीकरणासाठी नवीन अवजारे कोणती आहेत?
- यांत्रिकीकरण काळाजी गरज असल्याने कृषी विद्यापीठाने विविध यंत्र विकसित केले असून, यंत्र शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी कंपन्यासोबत सामंज्यस करार करण्यात आला आहे. हे सर्व यंत्र शेतकºयांना बघण्यासाठी येथे उपलब्ध आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यतातून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी निविष्ठा, शेतकरी उपयोगी साहित्य आदीची दालने येथे आहेत.
प्रश्न- कृषी विद्यापीठाकडून महिला शेतकरी, उद्योजकांसाठी येथे काय आहे?
महिला शेतकºयांनी पुढे यावे म्हणून दरवर्षी महिला दिनी शेती क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाºया महिलांचा सत्कार करण्यात येतो. स्वयंसाहाय्यता बचत गटांच्या महिलांनी साधलेली प्रगती महिला वर्गाला प्रेरणादायी ठरणारी आहे. त्यासाठी बचत गटाची दालने येथे लावण्यात आली आहेत. त्यांनी कृषी पूरक व्यवसायांच्या माध्यमातून येथे विविध उत्पादने आणली आहेत. त्याला शेतकºयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रश्न-सेंद्रिय शेतीला शेतकºयांचा प्रतिसाद कसा आहे?
सेंद्रिय शेती विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यावर कृषी विद्यापीठाने भर दिला असून, सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले अन्नधान्य डाळी येथे उपलब्ध आहे. शेतकरी उत्सुकतेने सेंद्रिय शेतीची माहिती जाणून घेत आहेत. नागार्जुन, कापूस संशोधन, तेलबिया, उद्यानविद्या, जैवतंत्रज्ञान, वनविद्या, पशुसंवर्धन, कोरडवाहू शेती संशोधन, मृद, रसायन, फूलशेती, भाजीपाला, फळे, संत्रा, लिंबू, कृषी विद्या, ज्वारी, कडधान्य आदी सर्वच संशोधन येथे आहे. यावर्षीचे शुभ्र कापसाचे वाण, सोयाबीन, फुलाच्या नवीन जाती, शेतकºयांसाठी येथे आहेत. लाख कल्टीवेशन कसे करावे, हेदेखील आहे.