पारस : पारस बरड येथील एका ३४ वर्षीय शेतमजुराचा शेतात फवारणी केल्यानंतर विषबाधा झाल्यामुळे अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना ६ ऑक्टोबर रोजी सकाळी मृत्यू झाला.पारस बरड येथील शेतमजूर शेख इम्रान शेख लाल या शेतमजुराने २८ ऑगस्ट रोजी एका शेतकर्याच्या शेतातील पिकावर कीटकनाशकाची फवारणी केली. तेथून घरी आल्यानंतर सायंकाळी त्याला त्रास होऊ लागला. तो २९ ऑक्टोबर रोजी त्रास वाढल्यामुळे कुटुंबीयांनी त्याला अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्याच्यावर तेव्हापासून उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान प्रकृती अधिकच बिघडून ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ४ वाजता शेख इम्रानचा मृत्यू झाला. मृतक शेख इम्रान शेख लाल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, वडील व भाऊ असा आप्त परिवार आहे. या घटनेचे वृत्त समजताच खासदार संजय धोत्रे यांनी इम्रानच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आमदार बळीराम सिरस्कार यांनी या घटनेची सविस्तर माहिती फोनवरून घेतली असून, ते ७ ऑक्टोबर रोजी इम्रानच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. -
फवारणीने घेतला शेतमजुराचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 2:38 AM
पारस : पारस बरड येथील एका ३४ वर्षीय शेतमजुराचा शेतात फवारणी केल्यानंतर विषबाधा झाल्यामुळे अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना ६ ऑक्टोबर रोजी सकाळी मृत्यू झाला.
ठळक मुद्देशेतात फवारणी केल्यानंतर विषबाधाअकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू