शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

विदर्भातील शेतकऱ्यांचा ‘बीबीएफ’ तंत्राकडे कल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 10:59 AM

Vidarbha farmers turn to 'BBF' technique : पिकांच्या उत्पादन वाढीसाठी रुंद वरंबा सरी लागवड (बीबीएफ) पद्धत फायदेशीर ठरत आहे.

- सागर कुटे

अकोला : पावसाचा दीर्घकालीन खंड, अधिकच्या पावसामुळे साचून राहणारे पाणी, यामुळे पिकांची वाढ व उत्पादनावर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट येते. अशावेळी पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, पिकांच्या उत्पादन वाढीसाठी रुंद वरंबा सरी लागवड (बीबीएफ) पद्धत फायदेशीर ठरत आहे. विदर्भात या तंत्राव्दारे हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड केली आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांची प्रयोगशीलतेकडे वाटचाल सुरू आहे.

अनेकानेक वर्षांपासून विदर्भातीलशेतकरी पारंपरिक पीक पद्धतीनेच सोयाबीनची पेरणी करीत आहे. या पद्धतीत लागवड खर्च वाढत असून उत्पन्न मात्र कमी होत आहे. यातच अवेळी पाऊस, तापमानात बदल यामुळे पिकांवर परिणाम होत आहे. अशावेळी पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे, पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी अलीकडे रुंद वरंबा सरी लागवड (बीबीएफ) प्रचलित होत आहे. गत दोन-तीन वर्षांपासून विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात या पद्धतीने पेरणी करण्यात वाढ झाली आहे. जास्तीत जास्त शेतकरी बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने पेरणी करीत आहे. या पद्धतीमुळे चांगले उत्पादनही हाती लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

विभागात सोयाबीन क्षेत्र

१४,९९,५९० हेक्टर

पेरणी झालेले क्षेत्र

१४,५०,००५

 

तंत्राचे फायदे

या पद्धतीत सोयाबीनच्या ३ अथवा ४ ओळी आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूंना सरी यामुळे कमी पावसाच्या काळात, मूलस्थानी जलसंवर्धन आणि अधिक पावसाच्या काळात अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते. ओलावा जास्त काळ टिकून राहतो, उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.

बीबीएफ तंत्राव्दारे पेरणी केल्यास २० टक्के उत्पन्नात वाढ, ८ किलो प्रती एकर बियाण्यांची बचत होते. चार दात्यांचे यंत्र पेरणीच्या दृष्टीने अतिशय चांगले व योग्य आहे. गादी वाफ्याचा योग्य परिणाम साधावयाचा असेल व जमिनीत पाणी जिरवायचे असेल तर हे तंत्र योग्य आहे. शिवाय अधिकचे पाणी सरीद्वारे निघूनही जाते.

- डॉ. शैलेश ठाकरे, विभाग प्रमुख, कृषी शक्ती व अवजारे विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीVidarbhaविदर्भ