- राजरत्न सिरसाट
अकोला : मान्सूनप्रणाली सक्रिय झाली असून, पश्चिम विदर्भात येत्या २३ ते २५ जूनपर्यंत दमदार सार्वत्रिक पावसाची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. पावसाअभावी शेतातील उन्हाळवाही रखडल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.यावर्षी समाधानकारक मान्सूनचे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागासह विविध खासगी वेधशाळांनी वर्तवले. तथापि, मान्सूनला येण्यासाठी पंधरा दिवसांचा विलंब झाला. याला ‘वायू’ चक्रीवादळ कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. आता मात्र मान्सूनप्रणाली सक्रिय झाली असून, तळकोकण, कोल्हापूरपर्यंत मान्सून पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवार, २० जून रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यंतचे चित्र बघितल्यास नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल मध्यअरबी समुद्र, कर्नाटक किनारपट्टीचा उर्वरित भाग, दक्षिण कोकण गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र व कर्नाटकचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा काही भाग व इशान्य भारताचा उर्वरित भाग तसेच पश्चिम बंगालच्या आणखी भागात झाली आहे. गेल्या चोविस तासात कोकण -गोवा तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मध्य महाराष्टÑात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला, तसेच कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी,मध्य महाराष्टÑात काही ठिकाणी,मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.२१ ते २४ पर्यंत राज्यात ठिकठिकाणी, काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात २१ जून विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी अधूनमधून पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्टÑ, मध्य महाराष्टÑ व मराठवाड्यात चांगल्या दमदार पावसाची शक्यताही कृषी हवामानशास्त्र विभागाने वर्तविली असून, विदर्भात २३ जूनला चांगला पाऊस येईल.
२३ जून ते २४ जून रोजी विदर्भात दमदार सार्वत्रिक पावसाची शक्यता आहे. शेतकºयांनी मात्र ६५ मि.मी.पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये,कमी ओलीत पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट असते.डॉ.रामचंद्र साबळे,ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ,पुणे .