राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी खान्देशातील जळगाव आणि विदर्भातील अकोला येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली आहे. यावर्षी अकोला येथे विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अपेक्षित होते. त्यासाठीचे संसाधने येथे उपलब्ध होती; परंतु नवीन इमारत उभारण्याचा घाट घातला जात असून, त्या इमारतीवर जवळ पास ३00 कोटी खर्च करण्यात येणार आहे. इमारत उभी राहण्यासाठी किती वर्ष लागतात, हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.अकोला व जळगावला राज्य शासनाने पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे. महाविद्यालयाची इमारत, प्रयोगशाळेसाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला दहा कोटी रुपये निधी दिला आहे. वर्हाडातील अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्याने त्या दृष्टीने मागील दोन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात हा विचार करू न विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अकोला व जळगाव खान्देश येथे महाविद्यालय मंजूर केले आहे. व्हेटरनरी कौन्सिल ऑफ इंडियाच्या निकषानुसार, महाविद्यालयाला जागा हवी आहे. अकोल्यात स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्थेची जागा आहे, तेथे एमएससी ते पीएचडीपर्यंतचा अभ्यासक्रम आहे. बीएससी व्हेटरनरीच्या प्रथम वर्षाला ६0 विद्यार्थी प्रवेश क्षमता राहील. सध्या स्ना तकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्थेची जागा उपलब्ध असून, प्रयोगशाळा उपलब्ध आहे. कर्मचारी, शास्त्रज्ञ तसेच अधिकारी वर्गही आहे. केवळ दोन विभाग सुरू करावे लाग तील, असे असताना येथे अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरू केली नाही. महाराष्ट्र पशू विज्ञान विद्यापीठाचे नवृत्त कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा यांनी त्यांच्या कार्यकाळात नवीन इमार तीचा हट्ट धरल्याने यावर्षी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे वृत्त आहे.
नवीन जागेत बांधणार महाविद्यालयसर्व संसाधने उपलब्ध असताना वाशिम रोडवरील कृषी विद्यापीठाच्या जागेत हे महाविद्यालय बांधण्याचा घाट घा तल्या जात आहे. त्यासाठी ही जागा निश्चित करण्यात आली आहे. या इमारतीवर २१0 ते ३00 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या इमारतीच्या बांधकामाला जवळपास ४ ते ५ वर्षांचा वेळ लागण्याची शक्यता असल्याने संसाधने असूनही प्रवेश रखडला आहे.
स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्थेची जागा उपलब्ध पदवी अभ्यासक्रम पाच वर्षांचा असल्याने ३00 विद्यार्थी येथे असतील. उर्वरित स्नातकोत्तर अभ्यासक्रमाचे १२0 विद्यार्थी म्हणजेच जवळपास ५00 विद्यार्थी येथे शिक्षण घेणार आहेत. त्यासाठीची जागा स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्थेची आहे. यामध्ये काही जागा घ्यावी लागेल. त्यासाठीची कृषी विद्यापीठाची जागाही उपलब्ध आहे. असे असताना नवीन इमारतीचा घाट घातला जात आहे.
इमारत बांधून झाल्यावर लवकरच पशू वैद्यकीय पदवी महाविद्यालय सुरू होणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.डॉ. हेंमत बिराडे, अधिष्ठाता,स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्था, अकोला.