अकोला : अकोला जिल्ह्यातील साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असणाऱ्या विदर्भ साहित्य संघ अकोला शाखेची २०२१ ते २०२६ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून या नूतन कार्यकारिणीत विदर्भ साहित्य संघ अकोला शाखेच्या अध्यक्षपदी विजय कौसल यांची तर कार्याध्यक्षपदी सीमा शेटे-रोठे यांची निवड करण्यात आली आहे. शाखेच्या सचिव पदी डॉ . विनय दांदळे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी सुरेश पाचकवडे आणि प्रा. निशा बाहेकर, कोषाध्यक्षपदी नीरज आवंडेकर आणि सहसचिवपदी प्रा. डॉ. सुहास उगले व मोहिनी मोडक यांची निवड करण्यात आली आहे. शाखेच्या कार्यकारिणी सदस्यांमध्ये विजय देशमुख, अशोक ढेरे, कल्पना कोलारकर, डॉ. साधना कुळकर्णी, प्रा. डॉ. गजानन मालोकार, डॉ. दिलीप इंगोले, गजानन घोंगडे, प्रा. डॉ. किरण वाघमारे यांची, तसेच प्रसिद्धी विभाग सांभाळण्यासाठी प्रा. नीलेश पाकदुणे यांची निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सदस्य डॉ. गजानन नारे हे पदसिद्ध सदस्य असून सुधाकरराव गणगणे, प्रा. पंढरीनाथ मांडवगणे, प्रा. पद्मा मांडवगणे, बाजी वझे, विनायक क्षीरसागर कार्यकारिणीचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत.