डॉ. किरण वाघमारे /अकोला : साहित्य क्षेत्रात नावलौकिक असलेल्या विदर्भ साहित्य संघाची पंचवार्षिक निवडणूक यावर्षी होऊ घातली आहे. कार्यकारी मंडळाच्या २२ सभासदांची निवड करण्यासाठी २२ जानेवारी ते १३ मार्च या कालावधीत निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नागपूर येथील विदर्भ साहित्य संघ ही साहित्य क्षेत्रातील एक प्रथितयश संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेचे पाच हजाराच्यावर आजीवन सदस्य आहेत. या संस्थेचा कार्यभार चालविण्यासाठी २२ सभासदांची नेमणूक लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन केली जाते. ही निवडणूक दर पाच वर्षांनी घेतली जाते. मागील सत्रात निवडणूक न होता अविरोध पद्धतीने सभासद निवडले गेले होते. १ एप्रिल २0१६ ते ३१ मार्च २0२१ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी २२ सभासद निवडण्याकरिता विदर्भ साहित्य संघाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. संघाच्या घटनेतील कलम-१२ नुसार ही निवड प्रक्रिया २२ जानेवारी ते १३ मार्च या कालावधीत राबविली जाणार आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीचे वारे जोरात!
By admin | Published: January 07, 2016 2:33 AM