- संजय खांडेकर
अकोला : अनेक भागात शिवशाहीला प्रतिसाद मिळत नसला, तरी विदर्भात मात्र एप्रिल, मे,जूनपर्यंत मोठी मागणी आहे. तीन महिन्यातील लग्न तिथीसाठी बाहेरगावी वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या मंडळीकडून शिवशाहीला पहिली पसंती मिळत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवशाहीला जास्त पसंती मिळत असल्याने संपूर्ण मे महिना आरक्षित झाला आहे. त्यामुळे अनेक वºहाडी मंडळीला शिवशाहीसाठी वेटिंगवर राहावे लागले.एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात लग्नाची दाट तिथी असून, बाहेरगावच्या लग्न वऱ्हाडसाठी खासगी लक्झरी गाड्या, लालडब्याच्या एसटी, ट्रॅक्स, टाटा सुमो, झायलो आदी गाड्यांची बुकिंग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातल्या त्यात शिवशाही महामंडळाची आणि वातानुकूलीत असल्याने जास्त मागणी आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाची लाल बसगाडी ४४ रुपये प्रति किलोमीटर अंतराने उपलब्ध आहे, तर शिवशाही गाडी ५४ रुपये प्रतिकिलोमीटर अंतराने ठेवली आहे. लालगाडीवर १८ टक्के जीएसटी आणि शिवशाहीवर केवळ ५ टक्के जीएसटी लागत असल्याने नागरिकांकडून शिवशाहीला अधिक पसंती आहे. लग्नसमारंभ आणि इतर समारंभासाठी शिवशाही परवडणाºया दरात उपलब्ध असल्याने आणि वातानुकूलित असल्याने प्रवाशांचा ओढा त्याकडे जास्त आहे. लालपरिच्या बसगाडीत आणि शिवशाहीत दहारु पयांचे अंतर आहे; पण जीएसटीच्या तुलनेत शिवशाही १३ टक्के स्वस्त पडत आहे. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या शिवशाही, लालपरिपेक्षाही स्वस्त ठरत आहे.*दहा शिवशाहींपैकी आठ बुकअकोला आगार क्रमांक एकमध्ये पाच शिवशाही असून, आगार क्रमांक दोनमध्ये पाच शिवशाही आहेत. दहापैकी आठ शिवशाही पुढच्या पंधरा दिवसांसाठी आरक्षित झाल्या आहेत. दैनंदिन फेºयापेक्षा लग्न समारंभात मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिवशाहीची बुकिंग वेटिंगवर आहे. अकोला आगार क्रमांक दोनला तीन शिवशाही मिळाल्या होत्या. वाशिमकडे दोन शिवशाही होत्या. वाशिम येथे शिवशाहीला प्रतिसाद मिळत नसल्याने तेथील दोन शिवशाही अकोला आगार क्रमांक दोनकडे वळत्या केल्या आहेत.-विदर्भातील उन्हाची तीव्रता अधिक असल्याने वातानुकूलीत शिवशाहीला अधिक पसंती मिळत आहे. सोबतच इतर वाहनांपेक्षा शिवशाही स्वस्त दरात मिळत असल्याने शिवशाही मे महिन्यासाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होत आहे.-अरविंद पिसोडे , व्यवस्थापक, आगार क्रमांक २, अकोला.