लाेकमत न्यून नेटवर्क, अकाेला: विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची खासगी बस ३० जून रोजी नागपुर वरून सायंकाळी ५ वाजता बैद्यनाथ चाैकातून प्रवासी घेत म्हाडा काॅलनी मार्गे पुण्यासाठी ही बस निघाली रात्री १० वाजता वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील राधाकृष्ण हाैटेलसमाेर थांबली़ अर्धा तास थाबून १०़ ३० वाजता येथून ही बस पुढे प्रवासासाठी निघाली हाेती़
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा तालुक्यातील माैजा पिंपळखुटा येथे स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर १ जुलै रात्री १.२२ मिनिटाने धावत्या बसचा समोरील टायर फुटल्याने ही बस समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून काही मिनिटामध्ये पेट घेतला़ या अपघातात २६ प्रवाशांचा मृत्य झाला असून, ९़ ४५ वाजता़ २५ मृतदेह सात रूग्णवाहिकेव्दारा बुलढाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आले़ दुपारी १२़ ३० वाजता मुख्यूमंत्री एकनाथ शिदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळी पाेहाेचणार आहेत़ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी १०़ ४५ वाजता घटनास्थळाला भेट दिली़ जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी १०़ ३० वाजता़ बुलढाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात पाेहाेचून मृतांची पाहणी केली़ मृताचा काेळसा झाझाल्याने ओळख पटविण्याचे काम सुरू आहे़ अकाेल्याहून फाफरेसीक चमूला पाचारण करण्यात आले आहे़