शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
3
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
4
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
5
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
6
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
7
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
8
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
9
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
10
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
11
मनोज जरांगेंनी कंबर कसली; दसरा मेळाव्याची सुरु केली तयारी, विविध ठिकाणी देणार भेटी
12
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
13
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
14
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
15
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
16
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
17
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
18
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
19
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
20
Gold Price Review: सोन्यापेक्षा चांदी अधिक महागली, महिन्याभरात ७१०२ रुपयांनी वाढली किंमत; कारण काय?

विदर्भात लागले पहिले ‘गार रोधक’ यंत्र

By admin | Published: March 24, 2015 12:31 AM

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास मिळणार बळ; खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील कास्तकाराचा प्रयोग.

अनिल गवई / खामगाव (जि. बुलडाणा): नैसर्गिक आपत्तीमुळे शेती उत्पादनात वारंवार घट होत असल्याने खामगाव तालुक्यातील प्रगतीशील कास्तकार दादाराव हटकर यांनी आपल्या शेतात ह्यगार रोधकह्ण यंत्र (स्केलर वेव्ह जनरेटर) बसविले आहे. गारांचे पावसात रुपांतर झाल्याने या यंत्रामुळे २८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्तीपासून या शेतकर्‍याच्या शेतीतील शेकडो एकरावरील पिकांचे नुकसान टळले आहे. विदर्भातील शेतीत प्रथमच हा प्रयोग करण्यात आला आहे. स्कॅलर वेव्ह जनरेटर या यंत्रणेत स्कॅलर लहरी आकाशात सोडल्या जातात. गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीच्यावेळी या यंत्राची ढगाच्या दिशेने सेटींग केल्यास गारा तयार होण्याची प्रक्रीया थांबविता येते. तसेच या यंत्रामुळे संत्र्याच्या आकारातील गारांचे अतिशय लहान गारांमध्ये रुपांतर होते. याशिवाय पावसाच्या वेगावर नियंत्रण मिळविता येणे शक्य होते. या बहुपयोगी यंत्राबाबत माहिती मिळाल्यानंतर दादाराव हटकर यांनी पुणे येथील शास्त्रज्ञांकडून ड्रिझलर (स्कॅलर वेव्ह जनरेटर) यंत्राबाबत बोलणी करुन गत महिन्यातच हे यंत्र आपल्या हिवरखेड शिवारातील शेतात बसविले. या यंत्रामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या गारपिटीवर नियंत्रण मिळविल्याचा अनुभव आपण घेतला असल्याचे दादाराव हटकर यांचे बंधू रमेश हटकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.*यंत्राला विजेची आवश्यकता नाहीस्कॅलर वेव्ह जनरेटर या यंत्रात तांबे, अँल्युमिनियम, लोखंड यासारख्या धातुंचा वापर केला आहे. हे यंत्र धातू विश्‍वातील स्कॅलर एनर्जी शोषून घेतात. या यंत्रासाठी विजेची आवश्यकता नाही. यंत्रांची वायर जमिनीला जोडली असता यंत्र सुरू होते. वजन ५0 किलोपर्यंत असल्यामुळे हे यंत्र हलविण्यास सोपे आहे. लहरी निघणार्‍या सर्व दिशेने पाईप फिरविता येत असल्याने हाताळण्यास हे यंत्र अतिशय सुलभ आहे.*गारांवर नियंत्रण मिळविता येतेहे यंत्र चालू केल्यानंतर ढगांची दिशा, वेग याचा अंदाज घेवून यंत्राची दिशा ठरवता येते. यंत्राच्या नळीतून स्कॅलर लहरी निघून आकाशात जातात. तेथे ढगांबरोबर अभिक्रिया झाल्यानंतर छोटे ढग विरघळतात व मोठय़ा ढगांचा भाग होवून जातात. त्यामुळे मोठय़ा ढगांचा आकार वाढतो. ढगांचा विद्युत भार वाढतो. गारा पडणार्‍या दिशेने यंत्र केल्यास ढग विरळ होतो. त्यामुळे गारांवर नियंत्रण मिळविता येते.