विजय शिंदे/आॅनलाईन लोकमत
आकोट, दि. 4 - शेतकरी संप दरम्यान विविध आंदोलन सुरू असतांना आकोट येथे रविवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला. दुपारपर्यंत चांगला प्रतिसाद भेटला. या बंदमुळे सकाळचा भाजीपाला न मिळताच नागरिकांना थैली हालवत परत जावे लागले.
सरसकट कर्जमुक्तीसह विविध मागण्याकरीता शेतकरी संघटनातर्फ आठवडी बाजार बंदचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत भाजीपाला अडत असोसिशन पांठीबा दिला होता. तर इतर व्यापारीनी सकाळ पासूनच बाजारात दुकाने मांडली नव्हती. काही तुरळक प्रमाणात चिल्लर विक्री सुरू होती. अडत दुकाने कुलुप बंद होती. आठवडी बाजार बंद राहणार असल्याने दुपारपर्यत ग्रामीण भागातील जनता बाजारहाट करीता आली नव्हती. बाजारात मात्र दुकानदाराना आवाहन करीत शेतकरी संघटनेचे ललीत बहाडे, सतीश देशमूख,लक्ष्मीकांत कौठकर, प्रफुल बदरखे, गजानन बोरोकार, बोद्रे सह कार्यकर्ता ठाण मांडुन होते. दरम्यान आजचे आठवडी बाजार बंदला 90 टक्के प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. शेतकरी मागण्या पुर्ण न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आकोट- तेल्हारा शेतकरी संघटनेने दिला.
https://www.dailymotion.com/video/x84519b