शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
3
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
4
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
6
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
7
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
8
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
9
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
11
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
12
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
13
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
14
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
15
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
16
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
17
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
18
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
19
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
20
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात

vidhan sabha 2019 : दावा शिवसंग्रामचा; ए व बी फॉर्म शिवसेनेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 10:57 AM

बाळापुरात शिवसंग्रामचे उपाध्यक्ष संदीप पाटील तर रिसोडमध्ये विष्णुपंत भुतेकर व प्रमोद गोळे हे प्रबळ दावेदार आहेत.

- राजेश शेगोकार

अकोला: शिवसंग्रामने महायुतीमध्ये अकोल्यातील बाळापूर व वाशिममधील रिसोड या मतदारसंघावर दावा करून तशी मोर्चेबांधणीही केली; मात्र या दोन्ही जागांवर शिवसेनेने आपल्या उमेदवारांना ए, बी फॉर्मचे वाटप केल्यामुळे शिवसंग्रामची विदर्भात कोरी पाटी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मात्र आम्ही आशावादी आहोत, अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे शिवसंग्रामला संधी मिळणार तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.विदर्भात शिवसंग्रामची मोर्चेबांधणी करण्यासाठी मेटे यांनी महिनाभरात लागोपाठ दोन वेळा बाळापूर व रिसोड मतदारसंघाचा दौरा करून कार्यकर्त्यांना या दोन्ही जागा आपल्याच, असा विश्वास दिला होता. त्यामुळे शिवसंग्रामने या मतदारसंघात तयारीही सुरू केली. बाळापुरात शिवसंग्रामचे उपाध्यक्ष संदीप पाटील तर रिसोडमध्ये विष्णुपंत भुतेकर व प्रमोद गोळे हे प्रबळ दावेदार आहेत. या दोन्ही जागांवर शिवसेनेने अनुक्रमे नितीन देशमुख व विश्वनाथ सानप यांना एबी फॉर्म दिल्यामुळे या जागांचा गुंता निर्माण झाला आहे. युतीची अधिकृत घोषणा नसताना सेनेने दिलेल्या या ए, बी फॉर्ममुळे युतीमध्ये या दोन्ही जागा सेनेलाच सुटल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. शिवसेनेने रविवारी संध्याकाळी त्यांच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले असले तरी युतीची घोषणा बाकी आहे. मुख्यमंत्र्यांशी आमचे बोलणे सुरू असून, संध्याकाळी त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. आम्ही मागितलेल्या मतदारसंघाबाबत आशावादी आहोत.विनायक मेटेअध्यक्ष, शिवसंग्राम 

 

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेShiv Senaशिवसेनाbalapur-acबालापूरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019