अकोला: विजय तेलंग स्मृती आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील सातवा सामना शुक्रवारी गडचिरोली व अकोला जिल्हा संघात अकोला येथे खेळण्यात आला. यामध्ये अकोला संघाने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळविला.गडचिरोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गडचिरोलीने ३५.४ षटकात सर्वबाद ९३ धावा काढल्या. दुर्गेश यादव याने सर्वाधिक २२ धावा काढल्या. अमेय आगाशे याने १९, सौरव देवडे याने नाबाद ११ धावांचे योगदान दिले. अन्य फलंदाजांनी अकोला संघाच्या भेदक गोलंदाजी पुढे नमते घेवून झटपट बाद झाले. अकोला संघाकडून मयुर बढे याने ८ षटकात १८ धावा देत ३ गडी बाद केले. स्वप्नील इंगळे, आकाश राउत, अंकुश वाकोडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. समीर डोईफोडे याला १ गडी बाद करण्यास यश मिळाले.अकोला संघाने प्रत्युत्तरात अवघ्या १२.३ षटकात ९९ धावा काढून लक्ष पूर्ण करीत सामन्यावर विजय मिळविला. सलामीचा फलंदाज आर्यन मेश्रामने नाबाद ३६ धावा काढल्या. अभिषेक शिखरकर ०५ धावा काढून सुरज पटवीकडून त्रिफळाचित झाला. अंकुश वाकोडे याने १३ धावा काढल्या. झटपट धाव करण्याच्या नादात अंकुश धावबाद झाला. मोहित राउतने नाबाद ३८ धावांची सुंदर खेळी करीत संघाला विजय मिळवून दिला. सामन्यात पंच म्हणून कपिल गिरी आणि विवेक वटाणे यांनी काम पाहिले.