शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
2
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
3
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
4
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
5
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
6
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
7
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
8
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
9
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
10
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
11
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
12
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
13
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
14
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
15
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
16
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
17
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
18
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
19
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
20
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 

गावातील शेतमालावर आता गावातच प्रक्रिया! मूल्यवर्धनासाठी कृषी विद्यापीठाचा पुढाकार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 9:54 AM

शेतीपूरक व्यवसायामुळे खेड्यांना पुन्हा सुबत्ता व गतवैभव प्राप्त व्हावे, या दृष्टीने भारतीय कृषी संशोधन परिषद, राज्यातील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून कार्यरत आहे.

अकोला : गाव, खेड्यातील शेतमालावर गावातच प्रक्रिया करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तंत्रज्ञान पुरविण्यासाठीचा पुढाकार घेतला असून, विदर्भासह आता पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात दोन प्रक्रिया उद्योग उभारण्यात आले. शेतमालाचे मूल्यवर्धन, शेतक-यांच्या सामाजिक, आर्थिक स्थितीत बदल घडावा हा या मागील उद्देश आहे.

शेतीपूरक व्यवसायामुळे खेड्यांना पुन्हा सुबत्ता व गतवैभव प्राप्त व्हावे, या दृष्टीने भारतीय कृषी संशोधन परिषद, राज्यातील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून कार्यरत आहे. विदर्भातील शेतक-यांनी या उपक्रमात बहुसंख्येने सहभाग घ्यावा, यादृष्टीने प्रयत्न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाकडून केले जात आहेत. त्यांना शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत विदर्भ, पश्चिम महाराष्टÑासह १७  गावांत कृषी माल प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आले असून, शेतकरी, बचत गटासह बेरोजगारांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत आहे. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने  प्रक्रिया उद्योगाची स्थापना करण्यात येत आहे. पुढच्या महिन्यात मराठवाड्यातही प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यात येणार आहे. डॉ. पंदेकृविचे  कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या संकल्पनेतूनकृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे व संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर यांच्या पुढाकाराने शनिवारी अहमदनगर जिल्ह्यातील शहर टाकळी येथे संतोष गादे यांच्याकडे श्री स्वामी समर्थ शेतकरी गट संचालित ज्ञानेश्वरी कृषी प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.या अगोदर पाथर्डी तालुक्यात प्रक्रिया उद्योग सुरू  करण्यात आला आहे.

कृषी विद्यापीठाच्या कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागातंर्गत भारतीय कृषी संशोधन परिषदने विशेष करू न कृषी माल प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष केंद्रित केले असून, प्रक्रिया  उद्योग टाकण्यासाठी तंत्रत्रज्ञान उपलब्ध  करू न  दिले जात आहे. त्यामुळे शेतक-यांचा कल प्रक्रिया उद्योगांकडे वाढत आहे. - डॉ. प्रदीप बोरकर,संशोधन अभियंता,डॉ. पंजबाराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती