दुसऱ्या टप्प्यात २३ जुलै रोजी अकोला पंचायत समिती सभागृहामध्ये सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, भूवैज्ञानिक, मनुष्यबळ विकास सल्लागार, सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार, पाणी गुणवत्ता सल्लागार व तालुकास्तरावरील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, गट समन्वयक, समूह समन्वयक यांना झूम ॲपद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सरपंच, ग्रामसेवकांनाही प्रशिक्षण
तालुका पातळीवरील प्रशिक्षणाचे आयोजन २८ ते ३१ जुलै या कालावधीत दोन टप्प्यात होईल. यामध्ये गाव कृती आराखड्याबाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या दोन प्रतिनिधींना झूम ॲपद्वारे प्रशिक्षण देतील.
ग्रामसभेत मंजुरीसाठी ठेवणार कार्यक्रम
गाव पातळीवर १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत गाव कृती आराखड्याच्या अनुषंगाने लागणारी माहिती कोबो टूल साधनांचा वापर करून संकलित करण्यात येईल. ५ ते ७ ऑगस्टदरम्यान प्राप्त माहितीवरून गाव कृती आराखड्याची निर्मिती व गाव कृती आराखडा पडताळणी प्रक्रिया करण्यात येऊन १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये मंजुरीकरिता कार्यक्रम पत्रिकेवर ठेवण्यात येणार आहे.