शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

गावठी हातभट्ट्यांचे जाळे उध्वस्त; चार जणांना बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By आशीष गावंडे | Published: April 10, 2024 8:46 PM

खदान पाेलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चांदुर येथील भिमराव गुलाबराव डाबेराव (६०)याला अटक करीत ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे

अकाेला: जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यात गावठी हातभट्ट्यांचे जाळे विस्तारले आहे. या व्यवसायातून लाखाेंची उलाढाल करणाऱ्यांच्या मुसक्या आवळत स्थानिक गुन्हे शाखेने गावठी हातभट्ट्यांचे जाळे उध्वस्त करीत चार आराेपींना बेड्या ठाेकण्याची कारवाइ केली आहे. याप्रकरणी सुमारे तीन लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

जिल्हयात अवैध दारू व गावठी हातभट्टीवर दारू तयार करून विक्री करणा-यांविराेधात स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली आहे. ‘एलसीबी’प्रमुख शंकर शेळके यांनी विविध पथकांचे गठन करीत हिवरखेड पाेलिस स्टेशनच्या ह‌द्दीतील सिरसोली येथे छापा घातला असता, आरोपी सदाशिव शंकर सोनोने (६१), मंगेश सदाशिव सोनोने (३५)दोन्ही रा. सिरसोली यांना अटक करीत ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पिंजर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील पातुर नंदापुर येथील अमोल उर्फ सोनु देवराव इंगळे (३०)रा. पातुर नंदापुर यास अटक करुन १लाख ५५ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. खदान पाेलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चांदुर येथील भिमराव गुलाबराव डाबेराव (६०)याला अटक करीत ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाइ ‘एलसीबी’चे ‘पीएसआय’ राजेश जवरे, दशरथ बोरकर, गोकुळ चव्हान, सुलतान पठाण, अब्दुल माजीद, रविंद्र खंडारे, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, अन्सार अहेमद, मोहम्मद आमीर, सतिश पवार, अशोक सोनवणे, प्रशांत कमलाकर यांनी केली.

खदान पाेलिसांना चपराकखदान पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील चांदूर येथे हातभट्टीद्वारे माेठ्या प्रमाणात गावठी दारुची विक्री हाेत असल्याची बाब ‘एलसीबी’ने चव्हाट्यावर आणल्यामुळे खदान पाेलिसांना सणसणीत चपराक बसली आहे. माेर्णा नदीकाठालगत तसेच सिंधी कॅम्प भागात खुलेेआम वरली,जुगार अड्डे सुरु असल्याची माहिती आहे.