कंत्राटदाराने निकृष्ट बांधकाम लपविण्यासाठी लिपापोतीच्या कामाला सुरुवात केली असता, ग्रामस्थांनी विरोध केला होता. त्यावेळी कंत्राटदाराने तूर्तास काम बंद ठेवले. दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला सुरू केली असता, उपसरपंच देवीदास जाधव, धनराज चव्हाण आदी ग्रामस्थांनी २७ एप्रिल रोजी निकृष्ट बांधकाम बंद पाडले. बांधकाम लपविण्यासाठी कंत्राटदारांनी कामाला सुरुवात केल्याची माहिती ताले यांना मिळताच, त्यांनी सोमवार रोजी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्याशी संपर्क साधून चौकशी होईपर्यंत काम थांबविण्याबाबतची विनंती केली. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थ आक्रमक झाले आणि बांधकाम बंद पाडून मजुरांना थेट घरचा रस्ता दाखविला. सावरगाव ग्रामपंचायतचे तत्कालीन सचिव पी. पी. चव्हाण यांनी गेल्या सात वर्षापासून ग्रामपंचायतचा संपूर्ण प्रभार दिला नाही तसेच झरंडी ग्रामपंचायतला पाणी फाऊंडेशनच्या मिळालेल्या १८ लाखाचे पारितोषिक धनादेशाच्या रकमेमध्ये कुठल्याही प्रकारची कामे न करता सदर रकमेचा अपहार केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
फोटो:
निकृष्ट बांधकामाच्या चौकशीस टाळाटाळ
सभागृहाच्या निकृष्ट बांधकामाची, आठवडा उलटूनही संबंधितांकडून चौकशी करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संबंधित व कंत्राटदार यांची मिलीभगत असल्याचे बोलले जात आहे. चौकशी झाल्याशिवाय पुढील काम करू देणार नाही. अशी भूमिका उपसरपंच व ग्रामस्थांनी घेतली आहे.