खेट्री (अकोला) : शिक्षक देण्याच्या मागणीसाठी चांगेफळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती आणि पालकांनी ११ मार्च रोजी शाळेला कूलूप ठोकून आंदोलन केले. या आंदोलनाची गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेउन एक शिक्षक दिल्याने शाळेला लावलेले कूलूप काढण्यात आले.चांगेफळ येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत १ते ४ वर्ग आहेत. परंतु या ४ वर्गाला शिकवण्यासाठी एकच शिक्षक कार्यरत आहे. शिक्षक देण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी संबंधितकडे निवेदनाद्वारे वारंवार केली. परंतु संबंधिताकडून अद्यापही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी ११ मार्च रोजी ७:३० वाजताच्या सुमारास शाळेला कुलूप लावून आंदोलनाला सुरुवात केली. शिक्षक मिळत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नसल्याची भूमिका पालकांनी घेतली होती. परंतु याबाबतची माहिती पातूरच्या गट शिक्षण अधिकारी दिपाली भटकर यांना मिळतात त्यांनी तातडीने दखल घेऊन प. स. चे. गट समन्वयक के.डी. चव्हाण व विस्तार अधिकारी रमेश राठोड यांना शाळेला भेट देण्याचे निर्देश दिले. चव्हाण व राठोड, यांनी शाळेला भेट देऊन पालक वगार्ची समजूत काढून १२ मार्च रोजी पासून तात्पुरता एक शिक्षक देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर पालकांनी शाळेचे कुलूप उघडले.(वार्ताहर)सध्या तात्पुरता एक शिक्षकाची नियुक्ती करून येत्या सत्रामध्ये कायमस्वरूपी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल.- दिपाली भटकर गटशिक्षणाधिकारी प.स. पातुरएक शिक्षक तात्पुरता देण्याच्या आश्वासनानंतर शाळेचे कुलूप उघडले आहे. जर शिक्षक ना मिळाल्यास पुन्हा शाळेला कुलूप ठोकू- राजू काळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चांगेफळ
शिक्षक देण्याच्या मागणीसाठी ठोकले शाळेला कूलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 6:27 PM