खेट्री: जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले पातूर तालुक्यातील जांब-चोंडी मार्गावर जांब गावानजीक नाल्यावरील पुलाचे काम मंजूर झाले आहे. कंत्राटदाराने पुलाच्या बांधकामासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी खड्डे खोदून ठेवले होते. रविवारी झालेल्या पावसामुळे हा मार्ग खरडून गेल्याने गावांचा संपर्क तुटला होता.
जांब-चोंडी हा रस्त्याचे तीन किलोमीटरचा खडीकरण केले आहे. शेतकऱ्यांना रस्त्याने ये-जा करताना कसरत करावी लागते. कंत्राटदार व संबंधितांच्या शून्य कारभार व हलगर्जीमुळे पुलाच्या बांधकामासाठी खड्डे खोदून ठेवले होते. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता खरडून गेल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. संबंधितांनी त्वरित दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
--------------------
शेतकऱ्यांना प्रवास करताना अडचण
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतीची कामे रखडली होती; परंतु आता चांगला पाऊस पडल्याने शेतीची कामे सुरू झाली आहेत. रस्ता खरडून गेल्याने शेतीची कामे खोळंबल्याची शक्यता नाकारता येत नाही. समाधानकारक पाऊस पडल्याने सोमवार रोजी सकाळी जांब येथील काही शेतकरी शेतात जाण्यासाठी बैल गाडी, शेती अवजारे घेऊन शेतात जाताना कसरत करावी लागत आहे.
-----------------------
गेल्या चार महिन्यापासून कंत्राटदारांनी पुलाच्या बांधकामासाठी खड्डे खोदले आहे. परंतु बांधकाम रखडल्याने अनेक जण खड्ड्यात पडल्याच्या घटना घडल्या आहे. आता पावसामुळे रस्ताच खरडून गेल्याने शेतीची कामे करण्यासाठी शेतात जाता येत नाही त्यामुळे शेतीची कामे खोळंबल्याचे चित्र आहे.
जयराम लढाड, उपसरपंच, जांब.
---------------
संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या शून्य कारभारामुळे बांधकामासाठी खड्डे खोदून बांधकाम रखडले आहे पावसामुळे रस्ता वाहून गेल्याने शेतीची कामे खोळंबली असून, ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे.
भारत घायवट, शेतकरी, जांब.
120721\186-img-20210712-wa0038.jpg
photo