जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. येथील दुकानांत गर्दी होत असून, कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत आहे. याबाबत माहिती मिळताच उरळ पोलिसांनी गावात भेट देऊन दुकानदारांना समज दिली. तसेच ग्रामपंचायत व महसूल कर्मचाऱ्यांनीही कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना समज दिली आहे. गावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, दुकानदार, मांस विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. दुकानांमध्ये गर्दी होत असून, मास्कचा वापर केला जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती असून, नागरिकांची चिंता वाढली आहे. सरपंच निशा शिरसाट, उपसरपंच सुशीला खोले, ग्रामपंचायत पदाधिकारी स्वामी किशोर खोले यांनी नियमांचे पालन करून ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
-----------------------------
कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांना समज देण्यात आली आहे. तरी कोणी नियमांचे उल्लंघन करीत असेल, तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात येईल.
- निशा शिरसाट, सरपंच ग्रामपंचायत आगर.