अकोला: पिकांवरील किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्टÑ कृषी औद्योगिक विक ास (एमएआयडीसी) महामंडळातर्फे एका कामगंध गोळ्यांच्या पॅकिंगऐवजी पाच ते सहा गोळ्या असलेल्या पाकिटांचा पुरवठा करण्यात आला आहे. या संदर्भात पुरवठादाराने अटी व शर्तीचा भंग केल्याप्रकरणी मंगळवार, ३ सप्टेंबर रोजी एमएआयडी प्रशासनाने पुरवठादाराला नोटीस बजावून दोन दिवसात खुलासा मागितला आहे.पिकांवरील विविध किडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतात कामगंध सापळे लावण्यासाठीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी तूर व सोयाबीनवरील किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी कामगंध सापळे लावण्यात येत आहे. या तंत्रज्ञानात नर किडींना आकर्षित करण्यासाठी सापळ्यामध्ये (हेलीकोवर्पा आर्मीजेरा) कामगंध गोळी लावावी लागते. या गोळ्यांचा पुरवठा करण्यासाठी ‘एमएआयडीसी’तर्फे निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यानुसार एका पाकिटात एक गोळ्ीचा अंतर्भाव करण्याची अट ‘एमएआयडीसी’तर्फे घालण्यात आली होती. तथापि, पुरवठादाराने अटी व शर्तीचा भंग करीत एका पाकिटात पाच ते सहा गोळ्यांचे पॅकिंग करू न पुरवठादेखील केला आहे. विशेष म्हणजे एका पाकिटाची किंमत २५ रुपये आहे.तथापि, एकाच पाकिटातील सहा गोळ्यांसाठी शेतकऱ्यांना २५ रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत असल्याचा आरोप होत आहे.
एका पाकिटात एकच (हेलीओवर्पा आर्मीजेरा) कामगंध गोळी असणे अनिवार्य आहे; परंतु एका पाकिटात पाच ते सहा गोेळ््या टाकून पुरववठा करण्यात आल्याचे निदर्शनात येताच संबंधित पुरवठादारास नोटीस पाठवून दोन दिवसात खुलासा मागितला असून, शासकीय योजनेत पुरवठा करताना शर्ती व अटीचा भंग केल्याप्रकरणी संबंधित पुरवठादारावर कठोर कारवाई करण्याची शिफारस मुख्य कार्यालयाकडे करण्यात येणार आहे. याबाबत चौकशीही करण्यात येत आहे. त्याची चौकशी करण्यात येऊन सुधारणा करण्यात येईल. शेतकऱ्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने आमचे काम सुरू आहे.- सत्यजित ठोसर,प्रादेशिक व्यवस्थापक,एमएआएडीसी,अकोला.