जीएमसीत ४० मुले भरती
रुग्णालय ओपीडी दाखल रुग्ण
जीएमसी - १५० - १२०
खासगी - ३०० - १५०
कोरोना नाही, डेंग्यूचेही संकट वाढले
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा वर्तविला जात आहे, मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनापेक्षा डेंग्यू, मलेरियासदृश तापीचाच लहान मुलांना जास्त धोका असल्याचे निदर्शनास येत आहे. सर्दी, खोकल्यासह अनेकांना थंडी वाजून ताप येण्याचे प्रकारही वाढले आहे.
ही घ्या काळजी
बहुतांश बालरुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियासदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. बदलत्या वातावरणासोबतच दूषित पाणी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे मुलांना आजार होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी घरात किंवा परिसरात पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पाणी उकळूनच प्यावे, उघड्यावरील खाद्य पदार्थ खाणे टाळणे आवश्यक आहे. प्रत्येकाने घरात कोविडच्या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहनदेखील तज्ज्ञ डॉक्टरांकडून केले जात आहे.
लहान मुलांमध्ये सर्दी, तापीचे प्रमाण वाढले आहे. सर्वोपचार रुग्णालयात दिवसाला साधारणत: १५० बालरुग्णांची वैद्यकीय तपासणी केली जाते. मुलांची डेंग्यू चाचणी केली जाते, मात्र त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मुलांच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, कुठलेही लक्षण दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करा.
- डॉ. विनित वरठे, विभाग प्रमुख, बालरोग विभाग, जीएमसी, अकोला