अकोला : पंढरपूर पायदळ वारी व मंदिरे उघडण्याची परवानगी देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी विश्व हिंदू परिषद अकोला जिल्हा शाखेच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
पंढरपूर पायदळ वारीसाठी परवानगी देण्यात यावी, आषाढी एकादशीपासून मंदिर व मठांतील पारंपरिक उत्सव, वारकरी सप्ताह, कीर्तन, प्रवचनावरील निर्बंध दूर करावे, ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यासह अडवणूक केलेल्या वारकऱ्यांना सन्मानपूर्वक मुक्त करून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे आदी मागण्यांसाठी विश्व हिंदू परिषद अकोला जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना देण्यात आले. या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोढिया, राहुल राठी, प्रकाश घोगलिया, तुळशीदास मसने महाराज, डॉ. प्रवीण चौहान, अश्विनी सुजदेकर, प्रताप विरवानी, सुधाकर बावस्कर, संदीप निकम, जयवंत राऊत, रामकृष्ण महाराज अंबुसकर, गणेश शिंदे, पवार महाराज, सोळंके महाराज, शाम महाराज धानोकार, सुरेश शिंदे महाराज, चंदू महाजन, पंढरी दोरकर, सुरेंद्र जैस्वाल , भागवत महाराज, विजय डहाके,मनोज अहिर, आदित्य शर्मा आदी सहभागी झाले होते.