अकोला : शेतकऱ्यांमधील कृषीधर्म जागृत करून, त्यांना गोवंश पालनाचे महत्व समजावून सांगणे, रसायनमुक्त शेतीसाठी प्रोत्साहीत करणे या उद्देशाने विश्व हिंदू परिषदेच्यावतीने १५ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत विदर्भात बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा व गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या दोन ठिकाणांहून ‘शेतकरी जागर यात्रा’ काढण्यात येणार असून, वर्धा येथे या यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेकडून सोमवारी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना सनतकुमार गुप्ता यांनी सांगितले की, शेतकरी बांधवांमधील कृषीधर्म जागृत करण्यासाठी विदर्भात दोन शेतकरी जागर यात्रा काढण्यात येणार आहेत. जिजाऊंची जन्मभूमी सिंदखेड राजा आणि अहेरी येथून या यात्रांचा शुभारंभ होणार आहे. एकून दहा दिवस चालणारी ही यात्रा २५५१ किमीचा प्रवास करणार आहे. स्वदेशीचा मुलमंत्र देणारे महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमी वर्धा येथे २६ जानेवारी रोजी या यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेत डीजीटल रथ राहणार असून, मोठ्या एलईडी स्क्रीनद्वारे जैविक शेती, गोपालन आदींचा जागर केला जाणार आहे. या स्क्रिनवर जैविक शेती यशस्वी करणाºया शेतकºयांच्या मुलाखती, गो-विज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापार व गो-सेवा केंद्र, म्हैसपूर या संस्थांनी केलेल्या अनुसंधानपर प्रयोगांची माहिती देण्यात येईल. तसेच या यात्रेतून गोवंश पालनातून समृद्धीकडे कसे जाता येईल, याविषयी प्रत्यक्ष होत असलेल्या कामाची चित्रफीत प्रदर्शीत केल्या जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेस संयोजक अॅड. अमोल अंधारे, अटल पांडे, महेंद्र देशमुख, गोविंदराव शेंडे, हेमंत थोरात, सुरज भगेवार, डॉ. संजय एकापूरे, राजेश्वर निवळ आदींची उपस्थिती होती.दररोज दोन शेतकरी मेळावे, ३ कृषी वार्ताया यात्रेदरम्यान, दररोज दोन शेतकरी मेळावे, ३ कृषी वार्ता व ३ कृषी चर्चा, रात्री कृषी किर्तन होणार आहे. विदर्भातील ८३ तालुक्यातील गावांमधील लाखो शेतकºयांशी संवाद साधण्यात येणार आहे. गोवंश पालनासोबत जैवीक शेतीचे यशस्वी प्रयोग करणारे शेतकरी या यात्रेत मार्गदर्शन करणार आहेत. गोवंश पालन व जैविक शेती करणााºया शेतकºयांचाही सत्कार करण्यात येणार आहे.