अकोला: अहमदनगर येथील ग्रामीण विकास अध्ययन केंद्र, समाजकार्य व संशोधन संस्थेद्वारे एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांसाठी अकाेला येथे क्षेत्रकार्य व संस्थाभेटीचे आयाेजन केले हाेते. विद्यार्थी श्रीकांत तळोकार यांनी संस्थेचे संचालक डॉ. सुरेश पठारे व प्रा. रवी राठोड यांच्या मार्गदर्शनात अकोल्यातील सामाजिक प्रश्नांची माहिती व्हावी, याकरिता अकोला महानगरपालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय, नेहरू युवा केंद्र, दिव्यांग आर्ट गॅलरी, इंद्रायणी मतिमंद मुलांची शाळा, बेघर निवारा, गायत्री बलिकाश्रम, अकोला पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत भरोसा महिला व बालकांकरिता सहायता केंद्र, कामगार कल्याण मंडळ मलकापूर, अकोला ब्लड बँक आदी ठिकाणी भेट देऊन संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली. तसेच संस्थेचे कार्य कशाप्रकारे चालते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी प्रा. सुरेश मुगुटमल, प्रा. जयमोहन वर्गे, प्रा. प्रदीप जारे, प्रा. विजय संसारे, प्रा. आसावरी झापके, प्रा. अविनाश गोरे, प्रा. रमेश वाघमारे आदींनी मार्गदर्शन केले.
अहमदनगरच्या संस्थेच्या अकोल्यातील विविध संस्थांना भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 4:19 AM