अकोला : शेतकऱ्यांच्या व्यथा समाजापर्यंत पोहोचविणारा, समाजप्रबोधन करणारा अन् लोकांच्या मनाचा वेध घेणारा कवी म्हणजेच डॉ. विठ्ठल वाघ आहेत. समाजसुधारक तसेच गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांचा वसा घेऊन चालणारा कवी डॉ. विठ्ठल वाघ यांचा सत्कार आपल्या हातून होणे हे भाग्यच, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले.शिवाजी महाविद्यालय येथे रविवारी आजोजित लोककवी डॉ. विठ्ठल वाघ अमृत महोत्सव सोहळ््याच्या उद््घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी सत्कारमूर्ती लोककवी डॉ. विठ्ठल वाघ, प्रतिभाताई वाघ, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, आयोजन समितीचे अध्यक्ष शिरीष धोत्रे, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, स्वागताध्यक्ष प्रा. तुकाराम बिरकड, प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय नरेशचंद्र ठाकरे, महापौर अर्चना मसने, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. गजानन पुंडकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य केशवराज मेतकर, रामचंद्र शेळके, हेमंतजी काळमेघ, शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक केशव गावंडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अपराजित यांनी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या साहित्यावर विश्लेषण करत, वºहाडी भाषेला सातासमुद्रापार नेणारे महाराष्ट्रातील एकमेव कवी असल्याचे सांगितले. तसेच ‘सूर्य-चंद्र जरी आले हाती विसरू नको माती’ याप्रमाणे डॉ. विठ्ठल वाघ हे आपल्यावरचं नातं जपून आहेत. कळवळीतून शब्द मांडणारा कवी म्हणजे डॉ. विठ्ठल वाघ असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. यानंतर सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक राजदत्त यांनी डॉ. वाघ यांच्याशी असलेलं नातं अन् त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. विठ्ठल वाघ यांच्या बोलण्यातून बाण निघतात, फटाके फुटतात तसेच त्यांच्यातील कवितेमधून शेतकऱ्यांबद्दल या मातीत सामान्य शेतमुजराबद्दल कळवळादेखील दिसून येत असल्याचे मत राजदत्त यांनी व्यक्त केले. संचालन धनंजय मिश्रा आणि आभार प्रदर्शन श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी मानले.