अकोला, दि. १0- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृह, औद्योगिक क्षेत्रासह कंपन्या, विविध दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर आदींसह विविध क्षेत्रात सेवारत कर्मचार्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी अथवा कामाच्या तासांमधून दोन तासांची सवलत जाहीर करण्यात आली आहे. उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीने तसा आदेश शुक्रवारी जारी करण्यात आला. उद्योग व्यवसाय क्षेत्रातील कर्मचार्यांना मतदानासाठी सहसा सुटी किंवा सवलत दिली जात नसल्याचे लक्षात घेता निवडणूक आयोगाने शुक्रवारी निर्देश जारी केले. त्यानुसार मतदानाच्या दिवशी २१ फेब्रुवारी रोजी संबंधित आस्थापनेवरील कर्मचार्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुटी किंवा कामाच्या तासांतून दोन तासांची सवलत देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्धमहापालिकेच्या निवडणूक विभागाने ५८७ मतदान केंद्र निश्चित केले आहेत. त्यानुसार मतदान केंद्रनिहाय मतदारांची यादी शुक्रवारी प्रशासनाने प्रसिद्ध केली. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासह महापालिक ा कार्यालयातील सूचना फलकावर सदर यादी लावण्यात आली. उद्या शनिवारी दुपारी २ नंतर ही यादी मनपा कार्यालयातून उमेदवारांना विकत घेता येईल.
मतदानासाठी कर्मचा-यांना दिली सुट्टी
By admin | Published: February 11, 2017 2:21 AM